नवी दिल्ली, 10 जुलै : भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) 100 रुपयांपेक्षा कमी किमतीतील दोन नवे प्रीपेड प्लान्स (Prepaid Plans) लॉन्च केले आहेत. हे नवे स्पेशल टॅरिफ व्हाउचर प्लान (Special Tarrif Voucher Plan - STV) सर्व नेटवर्कवर 3 GB हाय स्पीड डेटा (High Speed Data) आणि व्हॉइस कॉलिंगची (Voice Calling) सुविधा देतात. BSNL ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये 447 रुपयांचा नवा एसटीव्ही पॅकही समाविष्ट केला आहे. तसंच, 699 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये सुधारणा केली आहे. असे आहेत BSNLचे नवे प्लान्स बीएसएनएलच्या 447 रुपयांच्या प्लानमध्ये युझरला 100 जीबी डेटा (Data) दिला जातो. त्यात दररोज किती डेटा वापरावा, याची काही मर्यादा असत नाही. या प्लॅनमध्ये युझरला अनलिमिटेड कॉलिंगसह (Unlimited Calling) दररोज 100 एसएमएसची (SMS) सोयही दिली जाते. या प्लॅनची व्हॅलिडिटी 60 दिवस असते. यासोबतच युझरला Eros Nowचा फ्री अॅक्सेसही दिला जातो. बीएसएनएलच्या 94 रुपयांच्या नव्या प्लानमध्ये युझरला 90 दिवसांसाठी 3 जीबी डेटा दिला जातो. त्यात युझरला 100 मिनिट कॉलिंगची सुविधाही दिली जाते. ही मिनिटं संपल्यानंतर युझरला एका मिनिटाच्या कॉलिंगसाठी 30 पैसे शुल्क द्यावं लागतं. त्यासोबतच या प्लॅनमध्ये युझरला कॉलर ट्यूनची (Caller Tune) सुविधा 60 दिवसांपर्यंत दिली जाते. धक्कादायक! आगामी निवडणुकीत आव्हान नको म्हणून हत्या; नगरपरिषदेच्या सभापतीसह पाच जणांना अटक बीएसएनएलच्या 75 रुपयांच्या नव्या प्लानमध्ये 2 GB डेटा आणि 100 मिनिट कॉलिंग या सुविधा दिल्या जातात. त्याची वैधता (Validity) 60 दिवसांची असते. या प्लॅनमध्ये युझर्सना मोफत कॉलर ट्यून सुविधाही दिली जाते. 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल बीएसएनएलने 699 रुपयांच्या प्लानमध्ये बदल केला आहे. त्यानुसार आता युझरला दररोज 0.5 जीबी डेटा वापरण्यासाठी दिला जाणार आहे. हा डेटा संपल्यानंतर डेटा स्पीड 80 kbps होतो. या प्लॅनमध्ये युझरला दररोज 100 एसएमएसची सोयही दिली जाते. PRBT कॉलर ट्यून घेण्याची सुविधाही युझरला या प्लॅनसोबत मिळते. बीएसएनएलच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 180 दिवस अर्थात सहा महिन्यांची आहे. बीएसएनएलने 699 रुपयांचा हा प्लॅन प्रमोशनच्या (Promotional Plan) हेतूने सादर केला आहे. तो नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध असेल. युझर्सनी नोव्हेंबर महिन्याच्या आधी हा प्लॅन घेतला, तर त्यांना 160 दिवसांऐवजी 180 दिवसांची वैधता दिली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.