Home /News /technology /

तुम्हाला मिळतील 35 लाख रुपये, बिल गेट्स यांनी दिलीय ऑफर!

तुम्हाला मिळतील 35 लाख रुपये, बिल गेट्स यांनी दिलीय ऑफर!

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी एक ऑफर दिली आहे. त्यासाठी बिल गेट्स आणि मेलिंड़ा गेट्स फाउंडेशनकडून 35 लाख रुपये दिले जाणार आहेत.

    नवी दिल्ली, 04 डिसेंबर : भारतात स्मार्टफोनच्या विक्रीत वेगाने वाढ होत आहे. याच्या माध्यमातून डिजिटल व्यवहारही वाढले आहेत. लोकांना स्मार्टफोनवर अॅपवरून सहजपणे व्यवहार करता येतात. आता फीचर फोनवर असे व्यवहार वाढवण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी एक ऑफर दिली आहे. त्यासाठी बिल गेट्स आणि मेलिंड़ा गेट्स फाउंडेशनकडून 35 लाख रुपये दिले जाणार आहेत. एका रिपोर्टनुसार सध्या भारतात जवळपास 50 कोटी लोक फीचर फोनचा वापर करतात. या फोनवरून डिजिटल पेमेंट करणं थोडं कठीण आहे. दुसरीकडे युपीआयचा वापर करून 100 कोटी रुपयांचे व्यवहार केले जातात. पण सर्वाधिक व्यवहार हे स्मार्टफोनवरून होतात. नॅशनल पेमेंट्स ऑफ इंडियाने दावा केला आहेत की, फीचर फोनवर *99# डायल करून खूप कमी प्रमाणात पैसे पाठवले जातात. ही रक्कम 5 लाख रुपये इतकी आहे. आता फीचर फोनवरून युपीआयच्या माध्यमातून पैसे पाठवणं सोपं करण्यासाठी NPCI ने CIIE.CO, बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनसोबत करार केला आहे. बिल गेट्स फाउंडेशनने यासाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे.  ‘Grand Challenge Payments Using Feature Phones’  असं नाव असलेल्या या स्पर्धेत फीचर फोनसाठी डिजीटल पेमेंट सिस्टीम तयार करावी लागणार आहे. यासाठी बिल गेट्स यांनी 35 लाख रुपयांचे बक्षिस देणार असल्याचं सांगितलं आहे. 12 जानेवारीपर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. विजेत्याची घोषणा 14 मार्च 2020 ला होणार आहे. CIIE.CO आणि NCPI मिळून विजेत्यांचे नाव जाहीर करणार आहेत. स्पर्धक जे पर्याय सुचवतील त्याला चार नियमांच्या आधारे पडताळले जाईल. सहज वापर, व्यवहारात वाढ, सुरक्षितता, अडचण आल्यास ऑटोमॅटिक दुरुस्त पर्याय निघाला पाहिजे. यामध्ये सहभागी होण्यासाठी grand-challenge.ciie.co वर नोंदणी करता येते. या संकेतस्थळावर इतर माहिती देण्यात आलेली आहे. वाचा : कार घेताय? तर Hyundai Aura करा फक्त 10,000 मध्ये बूक!
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या