अनेकदा स्त्रियांना ओटीपोटात वेदना मासिक पाळी, गर्भपात किंवा पुनरुत्पादक गुंतागुंतांशी संबंधित असू शकते. ही वेदना येते आणि जाते आणि उपचार न करताही बरी होते. आज आम्ही तुम्हाला यावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
दालचिनी : दालचिनीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात जे पचनक्रिया सुधारतात. ओटीपोटात दुखत असल्यास एक दालचिनीचा एक तुकडा चघळा. याने तुम्हाला बरं वाटेल.
लवंग : लवंगामध्ये काही औषधीय पदार्थ असतात जे पोटातील गॅस कमी करण्यास आणि जठरासंबंधी स्राव वाढविण्यास मदत करतात. ज्यामुळे दबाव आणि क्रॅम्पिंग कमी होऊ शकते.
तुळस : तुळशीमधील औषधी गुणधर्म गॅस कमी करू शकतात, भूक वाढवू शकतात, पेटके दूर करू शकतात आणि संपूर्ण पचन सुधारू शकतात. तुळशीमधील युजेनॉल पोटातील ऍसिडचे प्रमाण कमी करते.
नारळपाणी : नारळपाण्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. हे पोषक द्रव्ये वेदना कमी करतात. ओटीपोटात दुखत असल्यास दर 4-6 तासांनी 2 ग्लास नारळाचे पाणी हळू हळू प्यावे.
केळी : केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम आणि फोलेट असते. हे पोषक द्रव्ये पेटके, वेदना आणि स्नायूंच्या उबळ कमी करण्यास मदत करतात.
अंजीर : ओटीपोटात दुखत असल्यास दिवसातून काही वेळा संपूर्ण अंजीर फळ खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला वेदनेपासून मुक्ती मिळण्यास मदत जोते.
लिंबू पाणी : ओटीपोटाच्या दुखण्यावर लिंबू पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. लिंबाचा अल्कधर्मी प्रभाव पोटातील अतिरिक्त आम्लता शांत करण्यास मदत करतो.
जिरे : ओटीपोटाच्या दुखण्यावर घरगुती उपाय म्हणून जिरे हा एक उत्तम पर्याय आहे. हे हायपर असिडिटी, ओटीपोटात वायू पसरणे आणि वेदना कमी करण्यास मदत करते.
पुदिना : ओटीपोटातील वेदना कमी करण्यासाठी पुदिन्याची पाने कच्ची किंवा शिजवून खावी. ती वेलचीसह उकळून त्याचा चहादेखील केला जाऊ शकतो.
पाणी : डिहायड्रेशनमुळे उलट्या आणि जुलाबामुळे पोट खराब होऊ शकते. भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या पचनसंस्थेतील आम्ल निघून जाऊ शकते ज्यामुळे तुम्हाला सुखदायक परिणाम मिळतो.