मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सावधान! iPhone, iPad किंवा Mac वापरत असाल तर त्वरित करा 'हे' काम, अ‍ॅपलनं दिला ‘हा’ इशारा

सावधान! iPhone, iPad किंवा Mac वापरत असाल तर त्वरित करा 'हे' काम, अ‍ॅपलनं दिला ‘हा’ इशारा

सावधान!  iPhone, iPad किंवा Mac वापरत असाल तर त्वरित करा 'हे' काम, अ‍ॅपलनं दिला हा इशारा

सावधान! iPhone, iPad किंवा Mac वापरत असाल तर त्वरित करा 'हे' काम, अ‍ॅपलनं दिला हा इशारा

Apple Devices Security Alert: सुरक्षा तज्ञांनी आयफोन, आयपॅड किंवा मॅकबुकचे विशिष्ट मॉडेल वापरणाऱ्या वापरकर्त्यांना ते अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई, 20 ऑगस्ट: अ‍ॅपल या अमेरिकन टेक कंपनी आपल्या सुरक्षा फीचर्ससाठी जगभर प्रसिद्ध आहे. आयफोन (iPhone), आयपॅड(iPad), मॅकबुक (MacBook) अशा डिव्हाइसच्या माध्यमातून ही कंपनी जगभरात लोकप्रिय झाली आहे.  अ‍ॅपल आपल्या डिव्हाइसमध्ये प्रगत तंत्रज्ञान आणण्यासोबतच सुरक्षेची पुरेपूर काळजी घेत असते. जर तुम्ही आयफोन, आयपॅड  किंवा मॅकबुक वापरत असाल तर सावधगिरी बाळगा, कारण ही डिव्हाइस बनवणाऱ्या अ‍ॅपल या अमेरिकन टेक कंपनीनं सुरक्षेच्या संभाव्य धोक्याबद्दल गंभीर इशारा  (Apple Security updates) दिला आहे. अ‍ॅपलच्या मते, हा धोका इतका गंभीर आहे की हल्लेखोर तुमच्या डिव्हाइसवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतात. याबाबत अ‍ॅपलनं बुधवारी दोन सुरक्षा अहवाल (Apple latest updates) जारी केले.

हे डिव्हाइस अपडेट करण्याचा सल्ला-

सुरक्षा तज्ञांनी आयफोन, आयपॅड किंवा मॅकबुकचे विशिष्ट मॉडेल वापरणाऱ्या युजर्सना ते अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. सुरक्षा तज्ञांनी आयपॅडसह iPhone 6s आणि त्यावरील काही मॉडेल्स अपडेट करण्यास सांगितलं आहे. iPad बद्दल बोलायचं झालं तर,  त्यातील पाचवं जनरेशन आणि त्यानंतरचे सर्व iPad Pro मॉडेल्स आणि iPad Air 2 अपडेट करण्याची शिफारस करण्यात आली आहे. MacOS Monterey असणारे Mac संगणक आणि काही iPod मॉडेल्स प्रभावित झाले आहेत.

हेही वाचा- स्मार्टफोनमधला डाटा कम्प्युटरवर ट्रान्सफर करायचा आहे? शून्य मिनिटांत होईल काम

धोका किती मोठा आहे?

अ‍ॅपलनं जारी केलेल्या सिक्युरिटी रिपोर्टनुसार, हॅकर्स तुमच्या डिव्हाइसवर म्हणजेच अ‍ॅडमिन ऍक्सेसवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतात. सोशल प्रूफ सिक्युरिटीच्या सीईओ रॅचेल टोबॅक यांच्या मते, हॅकर्स असा कोणताही कोड बदलू शकतात, जो तुम्ही वापरकर्ता म्हणून बदलू शकता. यावरून हा धोका किती मोठा आहे हे समजू शकतं. टोबकच्या मते, सर्वात मोठा धोका अशा लोकांना आहे जे सतत लोकांच्या नजरेत असतात, जसे की एक्टिविस्ट्स किंवा पत्रकार. ते देश किंवा राज्यासाठी हेरगिरी करणाऱ्या लोकांचे लक्ष्य असू शकतात.

First published:

Tags: Apple, Iphone, Security alert