Zoom App वापरत असाल तर सावध राहा, पोलिसांनी दिला इशारा; या 6 गोष्टी लक्षात ठेवा

Zoom App वापरत असाल तर सावध राहा, पोलिसांनी दिला इशारा; या 6  गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही मिटींग setting अशा प्रकारे बदल करा कि तुमच्या शिवाय मिटींग मधील अन्य कोणीही व्यक्ती ती रेकॉर्ड करू शकणार नाही.

  • Share this:

मुंबई 20 जून: कोरोना आणि लॉकडाउनमुळे नागरीक मोठ्या प्रमाणावर घरातूनच काम करत आहेत. (Work From Home) ऑफिसचं काम आणि एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी Zoom Appचा वापर होत आहे. ऑनलाईन मिटींग्जसाठी वापरायला हे App सोपे असल्याने zoom या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे. सायबर भामट्यांनी zoom app सदृश्य काही malware व फेक Apps बनवली आहेत. त्यामुळे हे App वापरताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे असं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आलं आहे.

आपल्या सहकाऱ्यांबरोबरच्या ऑनलाईन मिटींग्ज करिता zoom,  microsoft meetings, skype, cisco webex  इत्यादी सॉफ्टवेअरस/apps वापरली जात आहेत. zoom त्यामध्ये वापरायला सोपे असल्याने या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे.

सायबर भामट्यांनी zoom app सदृश्य काही malware व फेक अँप्स बनवली आहेत. तुम्ही जर ती डाउनलोड केलीत तर तुमच्या सर्व मिटींग्ज रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते व तुमच्या  device (मोबाईल /संगणक) चा ताबा देखील हे सायबर भामटे घेऊ शकतात. या फेक फाइल्सची नावही पोलिसांनी दिली आहेत.

नागरिकांनी झूम App हे अधिकृत वेबसाईट किंवा प्लेस्टोअरवरूनच डाउनलोड करावे. शक्यतो कुठलीही confidential माहिती अशा मिटिंग्समध्ये बोलणे टाळावे किंवा संबंधित लोकांशी थेट बोलूनच त्यांना ही माहिती द्यावी. मिटिंग ऍडमिनने मिटिंगचे Id व पासवर्ड हे शक्यतो संबंधित व्यक्तींनाच थेट कळवावेत, तसेच सदर पासवर्ड हा थोडा क्लिष्ट ठेवावा जेणेकरून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीस तो समजण्यास कठीण जाईल. तसेच संबंधित मिटिंग ऍडमिन /होस्टने फक्त मिटिंगच्या विषयाच्या संबंधित व्यक्तींची login request accept करावी.

तुमच्याही Whatsapp वरून गायब झालं होतं का Last seen? 'हे' आहे कारण

तसेच तुम्ही जर मीटिंग होस्ट असाल तर पुढील बाबी पण लक्षात ठेवणे गरजेचे आहेत

1) तुम्हाला जो random मिटींग id व पासवर्ड मिळेल त्याचाच  शक्यतो वापर करा, तुमचा कुठलाही id किंवा पासवर्ड वापरू नका.

२) तुम्ही मिटींग setting अशा प्रकारे बदल करा कि तुमच्या शिवाय मिटींग मधील अन्य कोणीही व्यक्ती ती रेकॉर्ड करू शकणार नाही .

3) मिटींग मध्ये सर्व अपेक्षित व्यक्तींनी login केल्यावर सदर मिटींग लॉक करा जेणेकरून अन्य कोणी व्यक्ती त्यात अनाहूतपणे login करू शकणार नाही .

4) मिटिंग setting अशी करा कि तुमच्या आधी व तुमच्या परवानगीशिवाय कोणी त्यात login करू शकणार नाही.

5) तुम्ही ,जर काही कारणाने मिटींग सोडून जात असाल किंवा  मिटिंग संपली असेल तर leave मिटींग चा option न वापरता end मिटींगचा option वापर करा .

6) मिटिंगची लिंक id व पासवर्ड ओपन फोरम वर शेअर करू नका.

हेही वाचा -

कोरोना योद्धांच्या मदतीला SMART WATCH; रुग्णाजवळ न जाता डॉक्टरांना मिळणार माहिती

कोरोनापासूनही बचाव करणारा हसता-बोलता FACE MASK; एकदा व्हिडीओ पाहाच

 

 

First published: June 20, 2020, 7:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading