बँक खात्यात पैसे जमा करताना, काढताना लागणार चार्ज? वाचा काय आहे यामागचं सत्य

बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) ट्रान्झेक्शनच्या नियमांमध्ये बदल केल्याचं बोललं जात आहे. परंतु ही व्हायरल बातमी चुकीचं असल्याचं समोर आलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) ट्रान्झेक्शनच्या नियमांमध्ये बदल केल्याचं बोललं जात आहे. परंतु ही व्हायरल बातमी चुकीचं असल्याचं समोर आलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होतेय, ज्यात असा दावा केला जातोय की, बँकेत पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी चार्ज द्यावा लागणार. बँक ऑफ बडोदाने  (Bank of Baroda) ट्रान्झेक्शनच्या नियमांमध्ये बदल केल्याचं बोललं जात आहे. परंतु ही व्हायरल बातमी चुकीचं असल्याचं समोर आलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. बँक ऑफ बदोडाने बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी चार्ज वाढवण्यात आले नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी चार्ज लागणार असल्याचा दावा चुकीचा असल्याचं पीआयबी फॅक्ट चेकने म्हटलं आहे. काय दावा करण्यात आला आहे - बँकेत पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी आता चार्ज द्यावा लागणार असा दावा केला जात आहे. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda)आपल्या ग्राहकांसाठी 1 नोव्हेंबरपासून ट्रान्झेक्शनच्या नियमांमध्ये बदल केले असल्याचं सांगत, हे बदल करंट अकाउंट, ओवरड्राफ्ट अकाउंट, कॅश क्रेडिट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट आणि इतर अकाउंट्ससाठी कॅश जमा आणि काढण्यासाठी सर्व्हिस चार्ज आणि चेकबुक संबंधित असल्याचं बोललं जात आहे. 1 नोव्हेंबरपासून निश्चित मर्यादेपेक्षा जास्त बँकिंग करण्यासाठी चार्ज लागेल. यावर बँक ऑफ इंडिया, पीएनबी, एक्सिस आणि सेंट्रल बँकही लवकरच निर्णय घेणार आहे, असाही दावा केला जात आहे. पैसे काढण्यासाठी इतका चार्ज लागणार असा दावा करण्यात आला आहे - - करंट अकाउंट, ओवरड्राफ्ट, सीसी बेस ब्रांच, लोकल नॉन बेस ब्रांच आणि आउटस्टेशन बँक द्वारे एका महिन्यात 3 वेळा कॅश काढणं फ्री - चौथ्यांदा 150 रुपये प्रति ट्रान्झेक्शन चार्ज - मेट्रो-अर्बन ब्रांचच्या सेव्हिंग अकाउंटमधून महिन्यातून 3 वेळा कॅश काढणं फ्री - चौथ्यांदा प्रति ट्रान्झेक्शन 125 रुपये चार्ज - ग्रामीण-अर्धशहरी ब्रांचमधील सेव्हिंग अकाउंट, पेन्शनर आणि आणि सिनियर सिटीजन अकाउंटमधून कोणत्याही ब्रांचमधून महिन्यातून 3 वेळा फ्री कॅश काढता येऊ शकते. याच्या चौथ्या ट्रान्झेक्शनपासून प्रति 100 रुपये चार्ज (वाचा - घर खरेदीसाठी चांगली संधी; फेस्टिव्ह सीजनमध्ये 'या' बँकांकडून व्याजदर कपात) पैसे जमा करतानाही चार्ज लागण्याबाबत असा दावा करण्यात आला आहे - - करंट अकाउंट, ओवरड्राफ्ट, कॅश क्रेडिट, इतर अकाउंट्ससाठी बेस आणि लोकल नॉन बेस ब्रांचमध्ये 1 नोव्हेंबरपासून कॅश हँडलिंग चार्ज, प्रतिदिन प्रति अकाउंट 1 लाख रुपयाहून अधिक कॅश जमा करताना, प्रति 1000 रुपयांवर 1 रुपया असेल. - हा चार्ज किमान 50 रुपये आणि अधिकाधिक 20000 रुपये असेल. - आउटस्टेशन ब्रांचमध्ये कोणतेही बदल नाही. हा चार्ज प्रति अकाउंट 25000 रुपयांहून अधिक कॅश जमा केल्यास प्रति 1000 रुपयांवर 2.50 रुपये आहे. - मेट्रो-अर्बन ब्रांचमध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये 3 वेळा कॅश जमा केल्यास, चौथ्यांदा 50 रुपये प्रति चार्ज लागेल. - ग्रामीण-अर्धशहरी ब्रांचमध्ये 3 वेळा कॅश जमा करताना, कोणताही चार्ज नाही. चौथ्या वेळेपासून पैसे भरताना प्रत्येक वेळी 40 रुपये लागणार. - तसंच खात्यात एका दिवसांत 50000 रुपयांहून अधिक कॅश जमा केल्यास, ग्राहकांना आपलं पॅन कार्ड दाखवावं लागेल आणि फॉर्म 60 जमा करावा लागेल.
    Published by:Karishma Bhurke
    First published: