टाटाची सर्वाधिक लोकप्रिय कार आणि जवळपास 8 महिन्यांपासून सर्वाधिक विकली जाणारी SUV टाटा नेक्सॉनवर 20 हजारांपर्यंत सूट मिळत आहे. नेक्सॉन डिझेलबद्दल बोलायचं झाल्यास कंपनीनं 15 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देऊ केली आहे. त्याचवेळी पेट्रोल व्हेरियंटवर 3 हजारांची कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहे.
टाटाच्या मध्यम आकाराच्या सेडान टिगोरवर 23 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. XE आणि XM प्रकारांवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे. दुसरीकडे XZ आणि XZ Plus वर दहा हजारांची रोख, दहा हजारांचा एक्सचेंज बोनस आणि तीन हजारांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.
कंपनीच्या हॅचबॅक टियागोवर 23 हजारांपर्यंत सूटही देण्यात आली आहे. Tigor प्रमाणे, या हॅचबॅकच्या XE आणि XT प्रकारांना 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. कॉर्पोरेट आणि एक्सचेंज बोनस व्यतिरिक्त, Tiago च्या XZ प्रकारावर 10,000 रुपयांची रोख सूट देखील दिली जात आहे.
कंपनी टाटाच्या प्रीमियम एसयूव्ही हॅरियरवर 40 हजारांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये रोख, कॉर्पोरेट आणि एक्सचेंज बोनस देखील समाविष्ट आहेत. हे लक्षात घेण्यासारखं आहे की हॅरियरची एक्स-शोरूम किंमत 14.69 लाख ते 22.04 लाख रुपये आहे.
टाटाने सफारीवरही सवलत देऊ केली आहे, जी भारतात लाँच केलेली एक दमदार SUV आहे. सफारीमध्ये टियागो प्रमाणे रोख, कॉर्पोरेट आणि 40,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील समाविष्ट आहे. सफारीची एक्स-शोरूम किंमत 15.34 लाख ते 23.5 लाख रुपये आहे.