मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Appleनं लाँच केलं 5G सपोर्ट असणारं नवं iPad, M2 Pro मॉडेलचंही लाँचिंग

Appleनं लाँच केलं 5G सपोर्ट असणारं नवं iPad, M2 Pro मॉडेलचंही लाँचिंग

Appleनं लाँच केलं 5G सपोर्ट असणारं नवं iPad, M2 Pro मॉडेलचंही लाँचिंग

Appleनं लाँच केलं 5G सपोर्ट असणारं नवं iPad, M2 Pro मॉडेलचंही लाँचिंग

नवीन M2 चिपसह iPad Pro आणि Apple TV 4K लाँच केली आहे. नवीन Apple TV A15 बायोनिक चिपद्वारे समर्थित आहे आणि HDR10+ ला सपोर्ट करतो. Apple च्या 10व्या पिढीतील iPad हे डिझाइनमध्ये iPad Air सारखेच आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 24 ऑक्टोबर: अ‍ॅपलच्या आयफोन, आयपॅड अशा डिव्हाईसची जगभरातील वेगळी ओळख आहे. क्वालिटी आणि क्लास या दोन्ही गोष्टी अ‍ॅपलनं जपल्या आहेत. म्हणून इतर उत्पादनांच्या तुलनेत किंमती प्रचंड असूनही ग्राहक अ‍ॅपलचे डिव्हाईस खरेदी करत असतात. कंपनीकडून ग्राहकांना बेस्ट ऑफ दी बेस्ट सव्हिस देण्याचा प्रयत्न केला जातो. कोणतंही डिव्हाईस बनवताना युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अ‍ॅपल कंपनी विशेष काळजी घेत असते. म्हणूनच अ‍ॅपलनं जगभरात स्वतःचं असं वेगळं विश्व तयार केलं आहे. अ‍ॅपलच्या आयपॅडचे जगभरात अनेक युजर्स आहेत. कंपनीकडून सतत यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला जातो.

अ‍ॅपलने मंगळवारी आपल्या काही नवीन उत्पादनांची घोषणा केली आहे. या उत्पादनांमध्ये 10व्या पिढीतील आयपॅडचा समावेश आहे. या iPad ची स्क्रीन 10.9 इंच आहे. जो आतापर्यंतचा सर्वात मोठा स्क्रीन आकार आहे. अ‍ॅपलचा हा नवीन iPad 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. याशिवाय, कंपनीने नवीन M2 चिपसह iPad Pro आणि Apple TV 4K लाँच केले. नवीन Apple TV A15 बायोनिक चिपद्वारे समर्थित आहे आणि HDR10+ ला सपोर्ट करतो.

हेही वाचा: SBI Alert: सावधान! ऑनलाइन वीज बिल भरताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं

नवीन लुकसह iPad लाँच -

अ‍ॅपलच्या 10व्या पिढीतील iPad हे डिझाइनमध्ये iPad Air सारखेच आहे. कंपनीने या iPad मध्ये A15 Bionic चिप बसवली आहे. कंपनीने आयफोन 12 सीरीजमध्ये ही बायोनिक चिप देखील वापरली आहे. यामुळे बॅटरीची कार्यक्षमताही सुधारली आहे, जी पूर्ण दिवसाचा बॅकअप देते.

नव्या iPadची वैशिष्ट्ये-

अ‍ॅपल आपपॅड मध्ये, कंपनीने 12-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड फ्रंट कॅमेरा आणि अपडेटेड 12MP बॅक कॅमेरा दिला आहे, जो अधिक चांगले फोटो घेण्यास सक्षम आहे. ज्वलंत फोटो आणि 4K व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी देखील हे खूप उपयुक्त आहे.

किंमत काय असेल?

नवीन iPad ची किंमत 44,900 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत वाय-फाय मॉडेलसाठी असून सेल्युलर मॉडेलची किंमत 59,900 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा आयपॅड चार वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. निळा, गुलाबी, पिवळा आणि चांदी या रंगांमध्ये उपलब्ध आहेत. स्टोरेजबद्दल बोलायचं झालं तर ते iPad 64GB आणि 256GB या दोन कॉन्फिगरेशनसह येते.

First published:

Tags: Apple