मुंबई, 24 ऑक्टोबर: वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्यांनी आता सतर्क राहण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा एक नवीन मार्ग शोधला आहे, जो वीज बिलाशी संबंधित आहे. खरं तर, अनेक वीज कंपन्या आणि पुरवठादार ग्राहकांना एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे बिल, बिलाची रक्कम आणि भरण्याच्या तारखेची माहिती देतात. वीजबिलाच्या नावाखाली फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार अशाच प्रकारचे संदेश पाठवून लोकांना अडकवतात. वीज कंपन्या किंवा पुरवठादार जशा प्रकारचे मेसेज पाठवतात त्याच प्रकारचे मॅसेज ते ग्राहकांना पाठवतात. मेसेजमध्ये काय असतं? या प्रकारच्या मेसेजमध्ये तुमचे वीज बिल थकल्याचं सांगितलं जातं. ते अपडेट करण्यासाठी ताबडतोब दिलेल्या नंबरवर कॉल करा. असं न केल्यास तुमचं वीज कनेक्शन खंडित केलं जाईल, असंही सांगितलं जातं. तसं होऊ नये यासाठी ते तुम्हाला कोणत्याही नंबरवर कॉल किंवा मेसेज करण्यास सांगतात. असे केल्याने तुमची आर्थिक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ते त्यांच्या उद्देशात यशस्वी होतात. असा संदेश आल्यावर काय करावे? जर तुम्हाला असा कोणताही मेसेज आला तर सर्वप्रथम तो मेसेज व्हेरिफाईड आयडी किंवा कोणत्याही मोबाईल नंबरवरून पाठवला गेला आहे हे तपासा. जर तो मेसेज एखाद्या नंबरवरून आला असेल तर तो फेक आहे, त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अशा मेसेजमध्ये दिलेल्या फोन नंबरवर कधीही संपर्क करू नका. तसेच, तुमचे वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील कोणाशीही शेअर करू नका. **हेही वाचा:** सेकंड हँड कमर्शिअल कारचं असं करा ट्रान्सफर, स्वस्तात खरेदी करता येईल एसबीआयनेही सावध केले- देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानंही लोकांना अशा संदेशांपासून (SBI अलर्ट) सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. ट्विटरवर अनेकांनी असं मेसेज येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यावर बँकेनं ग्राहकांना सावध राहण्यास सांगितलं आहे. अशा कोणत्याही मेसेजला उत्तर देऊ नका किंवा कॉल करू नका, असं बँकेने म्हटलं आहे. असं केल्यानं तुमची आर्थिक माहिती चोरीला जाण्याचा धोका असतो. वीज कंपनी किंवा पुरवठादार सहसा अधिकृत क्रमांकावरूनच एसएमएस पाठवतात.
अशी फसवणूक कशी टाळायची? तुम्ही तुमच्या वीज कंपनीशी किंवा पुरवठादारांशी संपर्क साधूनही वीज बिल अपडेट करू शकता. अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजवर कधीही विश्वास ठेवू नका. तसेच अशा नंबरवरून पाठवलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा. ऑनलाइन पेमेंट किंवा कुठेही कोणतीही आर्थिक व्यवहार करताना नेहमी क्रॉस चेकिंगद्वारे पडताळणी करा. तुम्हाला काही संशयास्पद दिसल्यास, तुम्ही त्याची तक्रार करू शकता.