Home /News /technology /

वीकएंडला सावधान! ताजमहालाच्या तिप्पट आकाराचा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार, NASAला ‘या’ गोष्टीची वाटतेय काळजी

वीकएंडला सावधान! ताजमहालाच्या तिप्पट आकाराचा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार, NASAला ‘या’ गोष्टीची वाटतेय काळजी

ताजमहालाच्या साधारण तिप्पट आकार (Three times as Taj Mahal) असणारा लघुग्रह (Asteroid) 25 जुलैला (25th July) पृथ्वीच्या (earth) जवळून जाणार आहे.

    ानवी दिल्ली, 19 जुलै : ताजमहालाच्या साधारण तिप्पट आकार (Three times as Taj Mahal) असणारा लघुग्रह (Asteroid) 25 जुलैला (25th July) पृथ्वीच्या (earth) जवळून जाणार आहे. ‘2008 GO20’ असं या लघुग्रहाचं नाव असून त्याचा व्यास 220 मीटर (220 meters) असल्याची माहिती आहे. 25 जुलैला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 3 वाजता हा लघुग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल, अशी माहिती ‘नासा’नं (NASA) जाहीर केली आहे. पृथ्वीपासूनचे अंतर अंतराळ विज्ञानाच्या भाषेत ‘जवळ’ या शब्दाचा अर्थ सर्वसामान्य जीवनापेक्षा काहीसा वेगळा असतो. हा लघुग्रह पृथ्वीपासून 4 कोटी 70 लाख किलोमीटरवरून निघून जाणार आहे. मात्र अंतराळ विज्ञानाच्या दृष्टीने हे अंतर जवळ मानलं जातं. 19 कोटी 40 लाख किलोमीटरच्या आतील कितीही अंतर हे जवळचं अंतर मानलं जातं. नासाचे नोंदवली निरीक्षणं या लघुग्रहापासून पृथ्वीला धोका असल्याचं कुठलंही कारण सध्या दिसत नसून तो पृथ्वीच्या जवळून निघून जाणार आहे. मात्र या लघुग्रहाचा आकार मोठा असल्यामुळे आणि तो पृथ्वीच्या खूपच जवळून जाणार असल्यामुळे नासाकडून पूर्ण सतर्कता बाळगली जात आहे. पृथ्वी आणि त्या लघुग्रहाचं गुरुत्वाकर्षण यांचा एकत्रित परिणाम होऊन अनेकदा लघुग्रहाची दिशा बदलण्याची शक्यता असते. तसं झालं तर तो लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्याची किंवा पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत या लघुग्रहांची दिशा बदलण्याचे तंत्र नासाकडे असले, तरी दरवेळी त्यासाठी पुरेसा वेळ मिळेलच, याची शाश्वती नसते. हे वाचा - गुगल क्रोम वापरत असाल तर ब्राउझर तातडीने अपडेट करा अन्यथा चोरी होऊ शकतो डेटा नासाची यंत्रणा नासाने त्रासदायक ठरू शकणारे लघुग्रह पृथ्वीवर आदळण्यापासून वाचवण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार केली आहे. त्यानुसार पृथ्वीवरून लघुग्रहाच्या दिशेनं एक स्पेसक्राफ्ट पाठवण्यात येतं. येत्या नोव्हेंबर महिन्यात नासाकडून असंच एक स्पेसक्राफ्ट अंतराळात पाठवलं जाणार आहे. पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या आणि पृथ्वीला भविष्यात धोका निर्माण करणाऱ्या लघुग्रहांच्या संपर्कात हे क्राफ्ट येतं आणि तिथं एक मोठा स्फोट घडवला जातो. त्यामुळे त्या लघुग्रहांची दिशा बदलते आणि पृथ्वीचा धोका टळतो. नासाच्या या यंत्रणेमुळे भविष्यात पृथ्वीवर आदळणाऱ्या लघुग्रहांना अगोदरच रोखणं आणि त्यांची दिशा बदलणं आता शक्य होणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Nasa, Taj Mahal

    पुढील बातम्या