मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

याला म्हणतात ऑफर ! Amazonच्या सेलमध्ये 15,000 पेक्षा कमी किंमतीत घ्या 'हे' स्मार्टफोन्स

याला म्हणतात ऑफर ! Amazonच्या सेलमध्ये 15,000 पेक्षा कमी किंमतीत घ्या 'हे' स्मार्टफोन्स

स्मार्ट फोन (Smart Phone) घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी नक्की वाचा. 17 ऑक्टोबरपासून Amazon Great Indian Festival  सेल सुरु होणार आहे. यामध्ये 15,000 पेक्षाही कमी किंमतीत अनेक फोनचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई 15 ऑक्टोबर: गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये स्मार्टफोनची मागणी वाढली आहे. सध्या भारतीय बाजारात विविध मोबाईल कंपन्या असून अतिशय कमी किंमतीत ग्राहकांना मोबाईल मिळत आहेत. सॅमसंग, शाओमी आणि विवो, ओप्पोसारख्या कंपन्या आपल्या ग्राहकांना 15,000 रुपयांमध्ये उत्तम स्मार्टफोन उपलब्ध करून देत आहेत. 17 ऑक्टोबरपासून Amazon Great Indian Festival  सेल सुरु होत असून यामध्ये तुम्हाला हे स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे. महत्त्वाचं म्हणजे मोबाईलवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. या मोबाईलच्या किंमतीदेखील जाहीर करण्यात आल्या असून ग्राहकांना कॅशबॅक सुविधाही मिळणार आहे. Amazon Pay आणि ICICI Bank Credit card वरून तुम्हाला या कॅशबॅकचा लाभ घेता येणार आहे. प्रत्येक मॉडेलनुसार EMI आणि कॅशबॅक किंवा क्रेडिट कार्ड सवलतींचे पर्याय उपलब्ध आहेत. 1) REDMI 9 PRIME (4GB + 64GB)     या रेडमी स्मार्ट फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर, 5,020mAh ची बॅटरी दिलीआहे. या फोनची स्क्रीन 6.53 इंचाची आहे. तसंच फुल एचडी IPS डिस्प्ले देण्यात आहे.  REDMI 9 PRIME ची किंमत अनुक्रमे 8,999 रुपये आणि 9,999 रुपये आहे. 2)SAMSUNG GALAXY M21 SAMSUNG GALAXY M21 या फोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी पल्स सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या स्मार्ट फोनमध्ये Exynos 9611 प्रोसेसर दिला आहे. 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी स्टोरेज मिळणार आहे. सॅमसंगच्या या फोनची किंमत 12 हजार 999 रुपये आहे. या सेलमध्ये तुम्ही या फोनवर कॅशबॅक सुविधेचा देखील लाभ घेऊ शकता. 3)OPPO A52 OPPO A52 या फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. तसेच कंपनीने या स्मार्ट फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये 12 मेगा पिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 13,990 रुपये आहे. 4)TECNO SPARK 6 AIR TECNO SPARK 6 AIR या फोनमध्ये 7 इंचाचा मोठा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या व्हेरियंटमध्ये 3 जीबी रॅमसोबत 64 जीबी स्टोरेज मिळते. या फोनमध्ये मीडियाटेक ए 22 प्रोसेसर आणि 6,000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत फक्त 8,699 रुपये आहे. 5)NOKIA 5.3 NOKIA 5.3 या फोनमध्ये 6 जीबी रॅम प्लस 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळणारआहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्नॅपड्रॅगन 665 SoC प्रोसेसर दिला आहे. तसंच फोनच्या मागे व पुढे फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. याफोनमध्ये 4000mAh बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत12,999रुपये आहे.
First published:

Tags: Amazon, Sale, Sale offers

पुढील बातम्या