मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Airtel कडून ग्राहकांना मिळणार New Year गिफ्ट; प्रीपेड प्लॅन्सवर बेस्ट ऑफर्स आणि डिस्काऊंट्स

Airtel कडून ग्राहकांना मिळणार New Year गिफ्ट; प्रीपेड प्लॅन्सवर बेस्ट ऑफर्स आणि डिस्काऊंट्स

Airtel प्रीपेड प्लॅन्सवर बेस्ट ऑफर्स

Airtel प्रीपेड प्लॅन्सवर बेस्ट ऑफर्स

नवीन वर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या रिचार्जवर भरघोस ऑफर देत आहेत.

मुंबई, 30 डिसेंबर: अलीकडच्या काळात देशात मोबाइलवर (Mobile) इंटरनेट (Internet)अर्थात डेटाचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. इंटरनेट सुविधा आता सर्वत्र अगदी सहज आणि स्वस्त किमतीत उपलब्ध असल्यानं अगदी खेड्यापाड्यातही इंटरनेटचा वापर वाढला आहे. तसंच संपर्कासाठी मोफत अॅप्स (Apps)उपलब्ध असल्यानं आजकाल व्हॉईस कॉलिंगपेक्षा (Voice Calling) डेटा वापराचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. त्यामुळे मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांनी व्हॉईस कॉलिंगपेक्षा डेटावर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्या अगदी कमी किमतीत जास्तीत जास्त डेटा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता प्रीपेड प्लॅनमध्येही (Prepaid Plans)अगदी कमी किमतीच्या रीचार्जवरदेखील (Recharge)डेटा दिला जातो.

यामुळे टेलिकॉम कंपन्यांमध्ये (Telecom Companies) स्पर्धा वाढली असून स्वस्तात डेटा देण्याच्या त्यांच्या चढाओढीत ग्राहकांना फायदा होत आहे. सध्या नाताळ, नवीन वर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या रिचार्जवर भरघोस ऑफर देत आहेत.

आता कोरोना लसीकरण प्रमाणपत्राची गरज नाही; हातातच बसवली जाणार मायक्रोचीप

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक कंपन्यांनी आपले प्रीपेड प्लॅन महाग केले होते. मात्र सध्या नाताळ, नवीन वर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या रिचार्जवर भरघोस ऑफर देत आहेत. यात अनेक आघाडीच्या कंपन्यांचा समावेश असून, एअरटेलनेही यात भाग घेतला आहे. भारती एअरटेल या देशातील एका आघाडीच्या मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी मोबाईल रिचार्जवर मोठी सूट तसंच अनेक आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. एअरटेलने प्रीपेड प्लॅनवर 50 रुपयांची सूट (Discount)दिली असून, अतिरिक्त डेटा कूपनदेखील दिले जात आहेत. मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी, ग्राहकांकडे एअरटेलचे थँक्स अॅप (Airtel Thanks App)असणे आवश्यक आहे. या अॅपवरून प्रीपेड प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना हे अतिरिक्त डेटा कूपन दिले जात आहेत.

एअरटेलच्या 359 रुपयांच्या बेसिक प्रीपेड प्लानमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जात असून, अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा आहे. एअरटेलचे थँक्स अॅपवरून हा प्रीपेड प्लॅन घेतल्यास 50 रुपयांची सूट मिळाल्यानं ग्राहकांना 309 रुपयेच द्यावे लागणार आहेत. याशिवाय या प्लॅनमध्ये अतिरिक्त 2 जीबी डेटा देण्यात आला असून, तो या प्लॅनच्या वैधतेच्या काळात कधीही वापरता येणार आहे. तसंच कंपनी 599 रुपयांच्या प्लॅनवरही 50 रुपयांची सूट देत असल्यानं या प्लॅनसाठी ग्राहकांना फक्त 549 रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये (Disney+ Hotstar Mobile)डिस्ने + हॉटस्टारचाही समावेश असून, दररोज 3 जीबी डेटासह अमर्यादित कॉल आणि 28 दिवसांची वैधता आहे. एअरटेलचा आधीचा 549 रुपयांचा प्रीपेड प्लॅन असेल तर त्यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा आहे. यासोबत कंपनी आता 4 जीबी डेटा कूपन देत आहे.

या सवलतींमुळे एअरटेलच्या ग्राहकांना सवलतीच्या दरासह जास्तीत जास्त डेटा मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भरपूर डेटा उपलब्ध होत असल्यानं नववर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणीत होणार आहे, हे नक्की.

First published:

Tags: Airtel, Recharge, Sale offers