मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

पृथ्वीसारख्या प्राचीन ग्रहांचे अवशेष खाताना दिसला तारा, 1000 कोटी वर्षांपूर्वींचा White Dwarf

पृथ्वीसारख्या प्राचीन ग्रहांचे अवशेष खाताना दिसला तारा, 1000 कोटी वर्षांपूर्वींचा White Dwarf

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

आता शास्त्रज्ञांना असंही कळलंय की व्हाईट ड्वार्फ अनेक एक्सोप्लॅनेट गिळतात. खगोलशास्त्रज्ञांनी याचं सर्वांत जुनं उदाहरण शोधलं आहे. एक व्हाईट ड्वार्फ सुमारे 1020 कोटी वर्षांपूर्वी तयार झाला होता आणि त्याने एक एक्सोप्लॅनेट गिळला होता.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Lanja, India

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : माणसाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं कुतूहल. त्यामुळे तो सतत शोध घेत राहतो. हाच शोध घेत तो अंतराळापर्यंत पोहोचला आणि खगोलशास्त्र हा अभ्यासाचा विषय विकसित झाला. पृथ्वीप्रमाणे सूर्यमालेतील इतर घडामोडींचा अभ्यास आजही आंतरराष्ट्रीय स्तरांवरील संस्था आणि संशोधक करत असतात. संशोधकांना नुकतेच दोन व्हाईट ड्वार्फ दिसून आले आहेत. त्याबद्दल संशोधन सुरू आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय.

मृत्यूनंतर सर्व तारे सुपरनोव्हामध्ये नष्ट होतात, असं नाही. ताऱ्याच इंधन संपल्यानंतर तो अस्थिर होतो आणि तो फुगतो, त्यामुळे त्यांचा आकार वाढतो. त्याचा एक गाभा लहान, अल्ट्राडेन्स व्हाईट ड्वार्फमध्ये बदलतो. समजा, जर सूर्य निष्क्रिय झाला तर तो मंगळाच्या दिशेने जाईल. ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक निष्क्रिय तारा त्याच्या जवळच्या ग्रहांना अस्थिर करतो आणि नष्ट करतो. परंतु भोवती ग्रह असलेले अनेक व्हाईट ड्वार्फ तारेदेखील आहेत. ते या प्रक्रियेत नष्ट न होता टिकून राहू शकतात.

दरम्यान, आता शास्त्रज्ञांना असंही कळलंय की व्हाईट ड्वार्फ अनेक एक्सोप्लॅनेट गिळतात. खगोलशास्त्रज्ञांनी याचं सर्वांत जुनं उदाहरण शोधलं आहे. एक व्हाईट ड्वार्फ सुमारे 1020 कोटी वर्षांपूर्वी तयार झाला होता आणि त्याने एक एक्सोप्लॅनेट गिळला होता. हा व्हाइट ड्वार्फ पृथ्वीपासून 90 प्रकाशवर्षं दूर आहे. हा खूप लहान आहे आणि इतर व्हाइट ड्वार्फच्या तुलनेत त्याचा रंग लाल आहे. तर, दुसरा व्हाइट ड्वार्फ निळा आहे. तो 900 कोटी वर्षांपूर्वी तयार झाला होता. दोन्ही ताऱ्यांना ग्रहांच्या ढिगाऱ्यांमुळे प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याचं टीमला आढळलंय.

लाल ताऱ्याचं नाव WD J2147-4035 आहे. तो आतापर्यंत सापडलेला सर्वांत जुना प्रदूषित व्हाइट ड्वार्फ आहे. तर, निळ्या ताऱ्याचं नाव WD J1922+0233 आहे. याच्या वातावरणात आढळलेल्या तत्त्वांवरून तो पृथ्वीसारखा एक ग्रह खात असल्याचं लक्षात येतंय.

ब्रिटनमधील वॉरविक विद्यापीठातील अॅस्ट्रो फिजिसिस्ट अॅबीगेल एल्म्स म्हणाल्या की, ताऱ्यापासून निघणाऱ्या प्रकाशातून आपण त्याच्या वातावरणातील रासायनिक रचना शोधू शकतो. सर्वांची वेव्हलेंथ सारखी नसते. काही मजबूत तर काही कमकुवत असतात. कारण हे घटक ताऱ्यातील प्रकाशाचं स्पेक्ट्रम बदलून प्रकाश शोषून पुन्हा उत्सर्जित करू शकतात.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) गाइया स्पेस ऑब्झर्व्हेटरीने दोन विलक्षण रंगाचे व्हाईट ड्वार्फ शोधल्यानंतर अॅबीगेल आणि तिच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल संशोधन करण्यास सुरुवात केली. हे संशोधन ‘मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’मध्ये प्रकाशित करण्यात आलंय. संशोधनानुसार या दोन्ही व्हाईट ड्वार्फ ताऱ्यांमध्ये शक्ती नाही, तसंच त्यांचं तापमानही हळूहळू कमी होतंय. हे तारे केव्हा बनले होते, त्याचा शोध तापमानावरून घेण्यात आला. नंतर त्यांनी ताऱ्यांच्या स्पेक्ट्राचं विश्लेषण केलं. लाल ताऱ्यावर त्यांना सोडिअम, लिथिअम, पोटॅशिअम व कार्बन आढळले, तर निळ्या ताऱ्यांवर त्यांना सोडिअम, कॅल्शिअम व पोटॅशिअम आढळले.

टीम WD J2147-4035 च्या बाबतीत म्हणते की, तिथल्या प्रदूषणात अशा ग्रहांचे अवशेष होते, ज्यांनी मृत्यूपूर्वी ताऱ्याची परिक्रमा केली होती. त्याचा मृत्यू सामान्य झाला नव्हता आणि तो कोट्यवधी वर्षांपासून हळूहळू मरतोय. तो सामान्य ताऱ्यासारखा मेला नाही आणि आता तो लाखो वर्षांपासून हळूहळू मरत आहे. हा तारा 1000 कोटी वर्षांपूर्वी व्हाईट ड्वार्फ बनला होता, त्यामुळे तो सर्वांत जुनी प्लॅनेटरी सिस्टम बनवतो.

WD J1922+0233 ला प्रदूषित करणाऱ्या राडारोड्यावरून त्याची रचना पृथ्वीच्या गाभ्यासारखी असल्याचं दिसतं. तो पृथ्वीसारखा ग्रह असू शकतो, जो सूर्यासारख्या ताऱ्याची परिक्रमा करत असेल. तसंच तो सूर्यमालेच्या निर्मितीच्या कोट्यवधी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता आणि नंतर मरण पावला असावा असा संशोधकांचा अंदाज आहे.

First published:

Tags: Earth