नवीन Royal Enfield Meteor 650 ही स्टायलिश क्रूझर बाईक आहे. या बाईकला समोरील बाजूस ऑल-एलईडी हेडलॅम्प, चंकी अपसाइड-डाउन फॉर्क्स आणि दहा-स्पोक अलॉय व्हील्स आहेत. मोटारसायकलला मस्क्यूलर इंधन टाकी, स्प्लिट सीट सेट अप, ट्विन एक्झॉस्ट पाईप्स आणि एलईडी टेल लॅम्प देखील मिळतो. (फोटो क्रेडिट्स: रॉयल एनफिल्ड)
नवीन बाइकमध्ये 650cc पॅरलल-ट्विन इंजिन आहे, जे इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 मध्ये देखील आढळते. तथापि तिला क्रूझर टच देण्यासाठी तिला थोडंस पुन्हा ट्यून केलं गेलं आहे. ही 650cc पॅरलल-ट्विन, एअर- आणि ऑइल-कूल्ड मोटर 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली, सुपर मेटिअरमध्ये 47 bhp आणि 52 Nm पीक टॉर्क विकसित करते. (फोटो क्रेडिट्स: रॉयल एनफिल्ड)