मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तब्बल 82 वर्ष जुन्या स्वदेशी कंपनीनं बनवलं जबरदस्त लढाऊ हेलिकॉप्टर, वाचा HALच्या खास गोष्टी

तब्बल 82 वर्ष जुन्या स्वदेशी कंपनीनं बनवलं जबरदस्त लढाऊ हेलिकॉप्टर, वाचा HALच्या खास गोष्टी

82 वर्ष जुन्या स्वदेशी कंपनीनं बनवलं जबरदस्त लढाऊ हेलिकॉप्टर, वाचा HALच्या खास गोष्टी

82 वर्ष जुन्या स्वदेशी कंपनीनं बनवलं जबरदस्त लढाऊ हेलिकॉप्टर, वाचा HALच्या खास गोष्टी

HAL सध्या लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर, जेट इंजिन, सागरी गॅस टर्बाइन इंजिन, एव्हीओनिक्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, भारतीय लष्करी विमानांचे ओव्हरहॉलिंग आणि अपग्रेडेशन यांच्या डिझाइन आणि निर्मितीमध्ये गुंतलेली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 3 ऑक्टोबर: सोमवारचा दिवस देशाच्या इतिहासात अविस्मरणीय ठरला. देशात बनवलेलं लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर म्हणजेच एलसीएचचा सोमवारी हवाई दलात समावेश करण्यात आला. स्वदेशी बनावटीचं असं स्ट्राइक हेलिकॉप्टर पहिल्यांदाच लष्करात सामील झालं आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये एलसीएच इंडक्शनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. देशातच मोठ्या प्रमाणावर संरक्षण उपकरणं आणि शस्त्रास्त्रांच्या विकासासाठी राजनाथ सिंह यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. संरक्षणमंत्र्यांनी या दिशेनं अनेक महत्त्वाची कामं पुढं नेली आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वदेशी कंपनीनं एलसीएच हेलिकॉप्टर बनवलं आहे. या कंपनीचे नाव हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल किंवा HAL आहे.

आज आपण हवाई दलासाठी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर तयार करणाऱ्या HAL बद्दल जाणून घेऊया. हेलिकॉप्टर बनवण्याचं संपूर्ण काम आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं स्वावलंबी भारत अभियान सुरू केलं आहे, ज्यामध्ये भारताला विविध क्षेत्रात स्वावलंबी करण्याचा उद्देश आहे. संरक्षण क्षेत्रात हे काम वेगानं वाढवलं ​​जात आहे. कारण भारत या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करतो. हा पैसा परदेशात जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि भारतात उत्पादन आणि रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी आत्मनिर्भर भारत मोहीम राबवली जात आहे. या दिशेने ही मोहीम अत्यंत यशस्वी ठरत आहे. एलसीएच हे त्याचे एक उदाहरण आहे.

1940 मध्ये कंपनीची स्थापना झाली-

या कंपनीची स्थापना 1940 साली झाली. कंपनी स्थापन होऊन 82 वर्षे झाली आहेत. Hal ही एक सरकारी कंपनी आहे जी एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात काम करते. कंपनीचं मुख्यालय बंगलोर येथे आहे. केवळ भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वात जुन्या एरोस्पेस-संरक्षण कंपन्यांपैकी ही एक आहे. HAL किंवा हालने 1942 च्या सुरुवातीला हार्लो PC-5, Curtiss P-36 Hawk आणि Vulture A-31 Vengeance च्या परवानाकृत उत्पादनासह भारतीय हवाई दलासाठी विमानं तयार करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: जबरदस्त! सुपरमॅनसारखं हवेतं उडण्याचं स्वप्न होणार साकार, त्यासाठी लागेल 'हा' खास सूट

HALकडे सध्या भारतभर 11 संशोधन आणि विकास (R&D) केंद्रे आहेत आणि 4 उत्पादन युनिट अंतर्गत 21 उत्पादन केंद्रे आहेत. HAL चे व्यवस्थापन भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयामार्फत केलं जाते आणि भारताच्या राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या संचालक मंडळाद्वारे देखरेख केली जाते. HAL सध्या लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, जेट इंजिन आणि सागरी गॅस टर्बाइन इंजिन, एव्हीओनिक्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, भारतीय लष्करी विमानांचे ओव्हरहॉलिंग आणि अपग्रेडेशन यांच्या डिझाइन आणि निर्मितीमध्ये गुंतलेली आहे.

HAL चा संपूर्ण व्यवसाय-

एचएएल म्हणजे हालचे अध्यक्ष आणि एमडी आर. माधवन हे आहेत. ही कंपनी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टसोबतच लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर बनवते. एका आकडेवारीनुसार या कंपनीचा महसूल 2022 मध्ये 24,620 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न 3,644 कोटी रुपये आहे आणि निव्वळ उत्पन्न रुपये 5,084.87 कोटी आहे. या कंपनीची एकूण मालमत्ता 53,120.49 कोटी रुपये आहे आणि एकूण इक्विटी 85,000.12 कोटी रुपये आहे. कंपनीची मालकी भारत सरकारकडे आहे आणि कंपनीत 28,345 कर्मचारी आहेत. हा कर्मचाऱ्यांचा आकडा 2019 पर्यंतचा आहे.

First published:

Tags: Helicopter