मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /5G चा तुमच्या आयुष्यावर काय होणार परिणाम; जाणून घ्या या टेक्नोलॉजीबद्दल

5G चा तुमच्या आयुष्यावर काय होणार परिणाम; जाणून घ्या या टेक्नोलॉजीबद्दल

केंद्र सरकारकडून 5G ट्रायलला मंजुरी दिली आहे. ज्यांना 5G स्पेक्ट्रमचं (Spectrom) वाटप करण्यात आलं आहे, त्यांनाच ही मंजुरी मिळाली आहे.

केंद्र सरकारकडून 5G ट्रायलला मंजुरी दिली आहे. ज्यांना 5G स्पेक्ट्रमचं (Spectrom) वाटप करण्यात आलं आहे, त्यांनाच ही मंजुरी मिळाली आहे.

केंद्र सरकारकडून 5G ट्रायलला मंजुरी दिली आहे. ज्यांना 5G स्पेक्ट्रमचं (Spectrom) वाटप करण्यात आलं आहे, त्यांनाच ही मंजुरी मिळाली आहे.

नवी दिल्ली, 9 मे: भारतात 5G टेक्नोलॉजीसाठीची तयारी सुरू आहे. परंतु अनेकदा यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारतात 5G टेस्टिंगमुळे लोकांचा मृत्यू होत असल्याचं किंवा 5G च्या वेव टॉवरमधील रेडिएशनमुळे माणसांच्या आयुष्यावर वाईट परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु हे दावे किती खरे आहेत, हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

सध्या आपण 4G टेक्नोलॉजीचा वापर करतोय. आता यापुढे येणारी नेक्स्ट जनरेशन टेक्नोलॉजी अधिक वेगवान असेल. 5G मुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार असून व्हिडीओ, डाउनलोडिंग, वेबसाईट ओपन करणं आणि इंटरनेटसंबंधी काम अधिक वेगात होईल.

5G टेक्नोलॉजी येण्याचा परिणाम स्मार्टफोन आणि इतर दुसऱ्या डिव्हाईसवरही होईल. 5G सुरू झाल्यानंतर याला सपोर्ट करणारे स्मार्टफोन महाग होऊ शकतात. त्यामुळे फोन खरेदी करणं, सर्वसामान्यांसाठी महाग ठरू शकतं. 5G आल्यानंतर 4G फोन्सची किंमत कमी होईल, असाही अंदाज आहे.

4G-LTE द्वारे केवळ 40 Mbps डाउनलोड आणि 25 Mbps अपलोड स्पीड मिळतो. परंतु 5G आल्यानंतर डेटा ट्रान्सफरसाठी Gbps चा स्पीड मिळेल.

(वाचा - आता छातीच्या X-Ray वरूनच समजणार तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?)

सोशल मीडियावर 5G रेडिएशनबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. पक्षांचा मृत्यू, कॅन्सरसारखे आजार होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. DNA तसंच, नर्वस सिस्टमसंबंधी अनेक समस्या येऊ शकतात, अशा धोक्यांविषयी दावे करण्यात आले आहेत. परंतु या दाव्यांचा कोणताही पुरावा नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही हे दावे नाकारण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून 5G ट्रायलला मंजुरी दिली आहे. ज्यांना 5G स्पेक्ट्रमचं (Spectrom) वाटप करण्यात आलं आहे, त्यांनाच ही मंजुरी मिळाली आहे. भारतात जिओ (Jio), भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि वी (Vi) या खासगी टेलिकॉम कंपन्या 5Gची ट्रायल सुरु करणार आहेत. परंतु, ही ट्रायल किती काळ चालेल हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

First published:

Tags: High speed internet, Internet, Internet use, Reliance Jio Internet