जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / प्रतीक्षा संपली! 'या' महिन्यात 5G सेवा सुरू होणार, वर्ष अखेरीस 20-25 शहरांमध्ये विस्तार

प्रतीक्षा संपली! 'या' महिन्यात 5G सेवा सुरू होणार, वर्ष अखेरीस 20-25 शहरांमध्ये विस्तार

प्रतीक्षा संपली! 'या' महिन्यात 5G सेवा सुरू होणार, वर्ष अखेरीस 20-25 शहरांमध्ये विस्तार

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी सांगितले की 5G ची सेवा ऑगस्ट-सप्टेंबरपासून सुरू होईल. वर्षाच्या अखेरीस 20-25 शहरे आणि गावांमध्ये 5G सेवा सुरू होईल. भारतातील सध्याच्या डेटाच्या किमती जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 जून : वेगवान इंटरनेट सेवेची (internet Service) वाट पाहणाऱ्या वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी आली आहे. 5G च्या (5G services) प्रतीक्षेत असलेल्या लोकांना या वर्षी ही सेवा मिळणे सुरू होईल. 5G सेवा या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (ashvini Vaishnav) यांनी शनिवारी सांगितले की, वर्षाच्या अखेरीस 20-25 शहरे आणि गावांमध्ये 5G सेवा उपलब्ध होईल. नवीन सेवा सुरू केल्याने जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात डेटाच्या किमती कमी राहतील, असेही त्यांनी सूचित केले. भारतातील सध्याच्या डेटाच्या किमती जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी आहेत. वैष्णव म्हणाले की 5G ची सेवा ऑगस्ट-सप्टेंबरपासून सुरू होईल. अनोळखी कॉलसाठी लवकरच कायदा मंत्री म्हणाले की भारत 4G आणि 5G स्टॅक विकसित करत आहे आणि डिजीटल नेटवर्कमध्ये जगासाठी एक विश्वासार्ह स्त्रोत म्हणून आपले स्थान मजबूत करण्यासाठी तयार आहे. ते एका कार्यक्रमात म्हणाले की, अनेक देश भारताद्वारे विकसित होत असलेल्या 4G आणि 5G उत्पादनांना आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य देऊ इच्छितात. युजर्सच्या प्रायव्हसीसाठी What’s App ने आणलंय ‘हे’ नवीन फीचर वैष्णव म्हणाले की, अनोळखी कॉलच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मंत्रालय एका महत्त्वपूर्ण नियमावर काम करत आहे. या अंतर्गत, कोणत्याही कॉलरचे केवायसी-केलेले नाव आता कळू शकणार आहे. 5G सेवेबद्दल, ते म्हणाले, “मी विश्वासाने सांगू शकतो की वर्षाच्या अखेरीस किमान 20-25 शहरे आणि गावांमध्ये 5G सेवा मिळेल.” 5G सेवांच्या किंमतीबद्दल विचारले असता, वैष्णव म्हणाले की आजही भारतातील डेटा दर 2 अमेरिकी डॉलरच्या आसपास आहेत, तर जागतिक सरासरी 25 अमेरिकी डॉलरच्या जवळ आहे. हाच ट्रेंड इतर भागातही असेल, असे ते म्हणाले. लिलाव मंजुरी 14 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी देण्यात आली आहे. दूरसंचार विभाग (DoT) या आठवड्यात लिलावासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात करेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की दूरसंचार कंपन्या 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची मागणी बऱ्याच काळापासून करत आहेत. वृत्तानुसार, 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पुढील महिन्यात सुरू होणार आहे. सरकारने 9 स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची योजना आखली आहे. हा लिलाव 20 वर्षांसाठी असेल. यामध्ये 600, 700, 800, 1,800, 2,100, 2,300 आणि 2,500 मेगाहर्ट्झ बँडचा लिलाव होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात