मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

युजर्सच्या प्रायव्हसीसाठी What's App ने आणलंय ‘हे’ नवीन फीचर

युजर्सच्या प्रायव्हसीसाठी What's App ने आणलंय ‘हे’ नवीन फीचर

युजर्सच्या प्रायव्हसीसाठी What's App ने आणलंय ‘हे’ नवीन फीचर

युजर्सच्या प्रायव्हसीसाठी What's App ने आणलंय ‘हे’ नवीन फीचर

What's App नेहमीत त्यांच्या युझर्ससाठी नवीन फिचर्स आणत असतं.यावेळी युझर्सच्या प्रायव्हसीचा विचार करुन What's Appनं नवीन फिचर लाँच केलं आहे.

मुंबई, 18 जून:  WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. WhatsApp हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलंय. अगदी बारीकसारीक कामांपासून ते ऑफिसची कामंही आपण WhatsApp वरून करतो. स्मार्टफोन (Smartphone) असलेला प्रत्येक जण WhatsApp वापरतो. न वापरणारे अगदी क्वचित लोक आपल्याला आढळतील. WhatsApp वर युजर्स मेसेज करून एकमेकांशी कनेक्टेड राहतात. या शिवाय फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस मेसेज तसंच महत्त्वाच्या कागदपत्रांची देवाणघेवाणही WhatsApp वरून केली जाते. स्टेटस अपडेट्स (Status Updates), कॉल्स, व्हिडिओ कॉल्सद्वारे (Video Calls) आपण आपल्या जवळच्या लोकांशी आणि मित्रमैत्रिणींशी जोडलेले असतो. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी अनेक नवनवीन फीचर्स आणत असतं. परिणामी, व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp ) फीचर्समध्ये अनेक बदल होत असतात आणि नवनवीन फीचर्सची त्यात भरही पडत असते. आता पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅपमध्ये (WhatsApp New Features) काही नवीन फीचर्स अ‍ॅड केली जाणार आहेत. या फीचर्सची युजर अनेक दिवसांपासून वाटत पाहत होते. हेही  वाचा - 'ही' नवी इलेक्ट्रॉनिक स्कूटर ठरतेय अनेकांची पहिली पसंत; काय आहे खास? काही दिवसांपूर्वी WhatsApp ने Twitter च्या माध्यमातून आपल्या प्लॅटफॉर्मसाठी नवीन फीचर अपडेटची घोषणा केली आहे. व्हॉट्सअॅपने म्हटलंय की त्यांच्या युजर्सच्या प्रायव्हसीची विशेष काळजी घेत त्यांनी एक नवीन अपडेट जारी केलं आहे. या अपडेटमध्ये मिळणारे फीचर्स WhatsApp च्या प्रायव्हसी कंट्रोल सेटिंग्जशी संबंधित आहेत. हे नवीन अपडेट अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमच्या स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय. काय आहेत नवीन फीचर्स या अपडेटमध्ये युजर्स आता आपला प्रोफाईल फोटो (WhatsApp Profile Photo), लास्ट सीन (WhatsApp Last Seen) आणि व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status) कोणाला दाखवायचं ते ठरवू शकतील. आतापर्यंत व्हॉट्सअॅप स्टेटस आणि लास्ट सीन कोण पाहू शकतं, यासाठी युजर्सना ‘एव्हरीवन’, ‘माय कॉन्टॅक्ट्स’ आणि ‘नोबडी’ हे तीन ऑप्शन देण्यात येत होते. मात्र, आता व्हॉट्सअॅपने यामध्ये 'My Contacts Except' हा पर्यायही अॅड केला आहे. त्यामुळे आता युजर्स त्यांच्या एकूण कॉन्टॅक्टपैकी कोण लास्ट सीन, आणि स्टेटस पाहू शकणार नाहीत, हे निवडू शकतील. तसंच व्हॉट्सअॅपच्या प्रोफाईल फोटोसाठीही हीच सेटिंग्ज अपडेट करण्यात आली आहेत. या नवीन अपडेटच्या माध्यमातून तुम्ही तुमचा प्रोफाईल फोटो, लास्ट सीन आणि स्टेटस कोण बघू शकतं किंवा कोण नाही ते ठरवू शकता.
First published:

Tags: Whats app news

पुढील बातम्या