जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / फक्त इंटरनेट स्पीडच नाही, 5G नेटवर्कमुळं तुमच्या आयुष्यातील ‘या’ गोष्टीही बदलणार

फक्त इंटरनेट स्पीडच नाही, 5G नेटवर्कमुळं तुमच्या आयुष्यातील ‘या’ गोष्टीही बदलणार

फक्त इंटरनेट स्पीडच नाही, 5G नेटवर्कमुळं तुमच्या आयुष्यातील ‘या’ गोष्टीही बदलणार

फक्त इंटरनेट स्पीडच नाही, 5G नेटवर्कमुळं तुमच्या आयुष्यातील ‘या’ गोष्टीही बदलणार

5G Network: भारतात लवकरच 5G सेवा लाँच होणार आहे. पण टेलिकॉम कंपन्यांनी 5G लाँच करण्यापूर्वी व्यापक सुधारणा करणं आवश्यक आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 सप्टेंबर: भारतात 5G इंटरनेट सेवांबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या महिन्याभरात भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडून 5G सेवा लाँच होणार आहे.  5G सेवा लाँच झाल्यानंतर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलणार आहेत. इंटरनेट क्षेत्रात क्रांती होईल- भारतातील दूरसंचार कंपन्या बऱ्याच काळापासून लोकांना 4G इंटरनेट सुविधा पुरवत आहेत. यामुळे लोकांना वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध होत आहे. परंतु 5G सेवा सुरू केल्याने भारतातील इंटरनेट क्षेत्रात क्रांती होईल. अशा परिस्थितीत 5G नेटवर्कचा भारतात कसा फायदा होईल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 5G मुळं आपली ‘संवाद’ करण्याची पद्धत बदलेल- 5G कनेक्टिव्हिटीमुळे लोकांची ‘संवाद’ करण्याची पद्धत बदलेल यात शंका नाही. पुढील पिढीतील हे तंत्रज्ञान जलद गती आणि कमी वेळेत इंटरनेट सुविधा प्रदान करेल. आत्तापर्यंत केवळ ऑप्टिकल फायबर ब्रॉडबँडवर अशी गती उपलब्ध होती, ज्याच्या माध्यमातून इतर उपकरणांना हायस्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान केली जात असे. अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये 5G इंटरनेटची सुरुवात खराब झाली आहे, कारण नेटवर्क कॅरियर्सना जुन्या 4G/LTE तंत्रज्ञानासह एअरवेव्ह सामायिक करण्यास भाग पाडलं गेलं. भारतात 5G रोलआउटच्या बाबतीत असं होणार नाही ना, याची काळजी घेणं महत्त्वाचं आह पहिल्या टप्प्यात जोडली 13 शहरे जोडली जाणार – 5G नेटवर्कच्या सुलभ आणि सुरळीत उपयोजनासाठी लहान सेल, विद्युत खांब, रस्त्यावरील फर्निचर इत्यादीसाठी तरतूद आहे. या सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू केल्या जातील आणि पहिल्या टप्प्यात 13 शहरांना 5G इंटरनेट सेवा मिळणार आहे. यामध्ये अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे. हेही वाचा:  रेल्वे स्टेशन किंवा अन्य ठिकाणी फोन चार्ज करताना सावधान! एकाच्या बँक खात्यातून 16 लाख उडवले दरात फारशी वाढ होणार नाही- 3G आणि 4G प्रमाणे, दूरसंचार कंपन्या देखील लवकरच समर्पित 5G टॅरिफ योजना जाहीर करतील आणि उद्योग तज्ञांच्या मते, ग्राहक त्यांच्या डिव्हाइसवर 5G सेवा वापरण्यासाठी अधिक पैसे देऊ शकतात. नोमुरा ग्लोबल मार्केट्स रिसर्चच्या अलीकडील अहवालात असा अंदाज आहे की, दूरसंचार सेवा प्रदात्यांकडे दोन पर्याय असतील - एकतर त्यांच्या एकूण ग्राहक बेसवर 4 टक्के दरवाढ किंवा 4G प्लॅनपेश्रा 30 टक्के प्रीमियम वाढवणं. एअरटेलचं सीटीओ रणदीप सेखॉन यांनी नुकत्याच दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की, जागतिक स्तरावर 5G आणि 4G टॅरिफमध्ये कोणताही मोठा फरक नाही.

News18लोकमत
News18लोकमत

5G चा भारताला कसा फायदा होईल? 5G भारतात नवीन गोष्टी घेऊन येईल. ज्याचा देशातील वापरकर्त्यांना अधिक फायदा होऊ शकेल. त्याच वेळी, हाय-स्पीड सर्फिंग आणि उत्तम कनेक्टिव्हिटी व्यतिरिक्त, नवीन तंत्रज्ञान हेल्थकेअर आणि मोबाइल बँकिंग सारख्या सेवांची पोहोच वेगानं वाढवेल. यासोबतच देशातील बेरोजगारांसाठी नोकऱ्यांच्या नवीन संधी निर्माण होतील. इतकंच नाही तर 5G च्या आगमनानं सध्याच्या टियर 3 शहरांचं स्मार्ट शहरांमध्ये रूपांतर झालेलं पाहायला मिळेल. यामुळं व्यवसाय जलद वाढण्यास मदत करेल. त्याचबरोबर नजीकच्या भविष्यात 5G प्रगत डिजिटल अर्थव्यवस्थेमुळं नागरिकांना सामाजिक-आर्थिक लाभाचाही लाभ मिळणार आहे.  5G सुरू झाल्यानं भारताला आरोग्य क्षेत्रात फायदा झाला- 5G नेटवर्कमुळे वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत वैद्यकीय प्रक्रिया दुर्गम भागात पोहोचवण्यात मदत होईल. त्याचबरोबर डॉक्टरांना त्यांच्या ठिकाणाहून रुग्णांशी, तसेच डॉक्टर सर्जनशी थेट संपर्क साधता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात