मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

5G Network: नवीन फोन घ्यायची गरज नाही, तुमच्या 4G फोनमध्येही मिळू शकतं फास्ट इंटरनेट

5G Network: नवीन फोन घ्यायची गरज नाही, तुमच्या 4G फोनमध्येही मिळू शकतं फास्ट इंटरनेट

एखाद्या 5G सपोर्टिंग डिव्हाईसला जर तुम्ही तुमचा फोन वाय-फायने कनेक्ट केला, तर तुमच्या स्मार्टफोनमध्येही 5G चा स्पीड (Get 5G speed in 4G device) मिळू शकेल. अन्यथा तुम्हाला नवीन 5G सपोर्टिंग स्मार्टफोन खरेदी करावा लागेल.

एखाद्या 5G सपोर्टिंग डिव्हाईसला जर तुम्ही तुमचा फोन वाय-फायने कनेक्ट केला, तर तुमच्या स्मार्टफोनमध्येही 5G चा स्पीड (Get 5G speed in 4G device) मिळू शकेल. अन्यथा तुम्हाला नवीन 5G सपोर्टिंग स्मार्टफोन खरेदी करावा लागेल.

एखाद्या 5G सपोर्टिंग डिव्हाईसला जर तुम्ही तुमचा फोन वाय-फायने कनेक्ट केला, तर तुमच्या स्मार्टफोनमध्येही 5G चा स्पीड (Get 5G speed in 4G device) मिळू शकेल. अन्यथा तुम्हाला नवीन 5G सपोर्टिंग स्मार्टफोन खरेदी करावा लागेल.

मुंबई, 8 ऑगस्ट: भारतात लवकरच 5G इंटरनेट (5G Internet in India) सुविधा सुरू होणार आहे. एअरटेलने यासाठी एरिक्सन, नोकिया आणि सॅमसंग या कंपन्यांशी (Airtel 5G Deal) करार केला आहे. यासोबतच इतर कंपन्याही 5G चाचण्या करत आहेत. सध्या वापरात असलेल्या 4G इंटरनेटच्या तुलनेत 5G अधिक वेगवान असेल. गेमिंग आणि एन्टरटेन्मेंट यासाठी हे इंटरनेट (5G Highspeed internet) भरपूर फायद्याचं ठरणार आहे. 4Gच्या तुलनेत 5Gचा वेग हा 100 पटींनी अधिक असू (5G Internet speed) शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या स्पीडने सुमारे 2 जीबींचा एखादा चित्रपट तुम्ही अवघ्या 10 सेकंदांत डाउनलोड करू शकाल. दैनिक भास्करने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. तुमचा फोन 5G ला सपोर्ट करतो का? तुमच्याकडे सध्या असणारा स्मार्टफोन 5G इंटरनेटला सपोर्ट (How to check if your smartphone supports 5G) करतो का हे तपासणं सोपं आहे. यासाठी सर्वांत आधी फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. त्यानंतर सिम कार्ड & मोबाईल डाटा, किंवा सिम इन्फो & सेटिंग्ज या पर्यायावर टॅप करा. तुमच्या फोनमध्ये दोन सिम कार्ड असतील, तर ज्या सिमचं 5G नेटवर्क तपासायचं आहे त्यावर टॅप करा. समोर आलेल्या पर्यायांमधून प्रीफर्ड नेटवर्क टाईप या पर्यायावर टॅप करा. यानंतर तुम्हाला सपोर्टेड पर्याय दिसतील. यात 2G, 3G, 4G आणि 5G असे पर्याय दिसून येतील. जर यामध्ये 5G हा पर्याय नसेल, तर तुमचा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट (Does my phone support 5G) करत नाही. फोन 4G असेल तरी मिळू शकतो स्पीड तुमचा फोन जर 4G असेल तर त्यात 5G इंटरनेट सपोर्ट करणार नाही. मात्र, तरीही फास्ट इंटरनेट मिळवण्याचा एक पर्याय तुमच्याकडे आहे. एखाद्या 5G सपोर्टिंग डिव्हाईसला जर तुम्ही तुमचा फोन वाय-फायने कनेक्ट केला, तर तुमच्या स्मार्टफोनमध्येही 5G चा स्पीड (Get 5G speed in 4G device) मिळू शकेल. अन्यथा तुम्हाला नवीन 5G सपोर्टिंग स्मार्टफोन खरेदी करावा लागेल. बजेटमध्ये 5G स्मार्टफोन 5G इंटरनेट मिळवण्यासाठी तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टींची खबरदारी (Tips to Buy 5G smartphone) घेणं गरजेचं आहे. नवीन फोनचा चिपसेट 5G ला सपोर्ट करतो की नाही हे तपासणं गरजेचं आहे. सोबतच फोनमध्ये किती 5G बँड्स आहेत हे पाहणेही आवश्यक आहे. जेवढे जास्त 5G बँड्स तेवढं चांगलं. 5G इंटरनेट वापरताना बॅटरीचा अधिक उपयोग होतो, त्यामुळे चांगल्या बॅटरी क्षमतेचा मोबाईल घेणं गरजेचं आहे. सध्या 5G स्मार्टफोन मार्केटमध्ये 13 हजार रुपयांपासून चांगले पर्याय (Affordable 5G smartphones) उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला यातील तीन पर्याय सांगणार आहोत. Poco M4 5G, OnePlus Nord CE 2 Lite 5G, Realme 9 5G SE असे हे तीन पर्याय आहेत. हे तिन्ही फोन 5G ला सपोर्ट करतात. तसंच या तिन्ही फोनची बॅटरी क्षमता 5000mAh एवढी आहे. पोको M4 5G या फोनचा बेस व्हेरियंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजचा पर्याय देतो. याची किंमत अवघी 12,999 रुपये आहे. तर, या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत 14,999 रुपये आहे. हा फोन अँड्रॉईड 12 या ओएसवर काम करतो. याला 6.58 इंच मोठा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच, यात ऑक्टा-कोअर मीडियाटेक डायमेंसिटी 700 SoC हा प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला मागच्या बाजूला दोन कॅमेरे आहेत, ज्यातील प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा पोर्ट्रेट कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. तुमचं बजेट थोडं जास्त असेल, आणि तुम्हाला चांगल्या ब्रँडचा स्मार्टफोन हवा असेल, तर रिअलमी 9 %G SE हा स्मार्टफोन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. या फोनचा बेस व्हेरियंट 14,999 रुपयांना उपलब्ध आहे, ज्यामध्ये 4 GB रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मिळेल. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज क्षमतेच्या व्हेरियंटची किंमत 17,499 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला अँड्रॉईड 11 व्हर्जन मिळतं. तसंच मीडियाटेक डायमेंसिटी 810 हा तगडा प्रोसेसर या फोनमध्ये देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले 6.5 इंच एवढा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप दिलेला आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर बाकी दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तुमच्यासाठी फोनचा ब्रँड महत्त्वाचा असेल, तर वनप्लस या मोठ्या ब्रँडचा स्मार्टफोनही वीस हजार रुपयांच्या आत उपलब्ध आहे. OnePlus Nord CE 2 Lite 5G या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत 19,999 रुपये आहे. यामध्ये अँड्रॉईड 12 आणि स्नॅपड्रॅगन 695 SoC हा ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्येही तुम्हाला 6.59 इंच फुल एचडी+ डिस्प्ले आणि ट्रिपल रेअऱ कॅमेरा सेटअप पाहायला मिळतो. यातील प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. तर सोबत 2 मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. 5G नेटवर्क प्लॅन किंमत 5G चे इंटरनेट प्लॅन्स किती रुपयांपर्यंत (5G tariff plans) असतील याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, 4Gच्या तुलनेत हे प्लॅन्स नक्कीच महाग असणार आहेत. मार्केटमध्ये भरपूर स्पर्धा असल्यामुळे सुरुवातीला कंपन्या स्वस्तात 5G उपलब्ध करून देतील, आणि कालांतराने याची किंमत वाढवतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 5G नेटवर्कमुळे, मोबाईल इंटरनेटचे जाळे आणखी पसरण्यास आणि मजबूत होण्यास चालना मिळणार आहे. दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टींवर याचा चांगला परिणाम होणार आहे.
First published:

Tags: Internet, Smartphone

पुढील बातम्या