जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 5G Auction: कॉल, इंटरनेटसह 'या' गोष्टी आता पूर्वीसारख्या राहणार नाहीत, भविष्याचा वेध आताच घ्या

5G Auction: कॉल, इंटरनेटसह 'या' गोष्टी आता पूर्वीसारख्या राहणार नाहीत, भविष्याचा वेध आताच घ्या

5G Auction: कॉल, इंटरनेटसह 'या' गोष्टी आता पूर्वीसारख्या राहणार नाहीत, भविष्याचा वेध आताच घ्या

5G Auction News: भारतात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू झाला आहे. टेलिकॉम कंपन्यांसोबतच अनेक नवीन खेळाडूही यामध्ये नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 जुलै : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर भारतात 5G नेटवर्क लाँच करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. म्हणजेच आजपासून 5G लिलावाला सुरुवात झाली आहे. 5G स्पेक्ट्रम लिलावात देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांसह इतर प्लेअर्सही सहभागी होत आहेत. 5G हे सेल्युलर तंत्रज्ञानातील नवीनतम तंत्रज्ञान आहे. ही 4G नेटवर्कची पुढील आवृत्ती आहे. 5G मध्ये, वापरकर्त्यांना अधिक वेग, कमी विलंब आणि अधिक फ्लेक्सिबिलिटी पाहायला मिळणार आहे. यामध्ये जिओ, व्हीआय आणि एअरटेलसह गौतम अदानी यांच्या अदानी डेटा नेटवर्कचा (Adani Data Networks) समावेश आहे. यामध्ये अदानी आणि अंबानींचा सामना पाहायला मिळणार आहे. या दोघांमध्ये थेट स्पर्धा नसली तरी भविष्यात संघर्ष होऊ शकतो. अशा परिस्थितीत अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो की 5G आल्यानंतर नवीन काय होणार? त्याचा सामान्य माणसावर कसा परिणाम होईल? आपल्या दैनंदिन जीवनात काही नवीन गोष्टी पाहायला मिळेल का? या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे 5G नेटवर्कच्या रोलआउटनंतरच उपलब्ध होतील. पण 5G नंतर बरेच काही बदलणार आहे. एक नवीन अनुभव 2000 च्या दशकात, बहुतेक लोक 2G किंवा 3G नेटवर्क वापरत होते. भारतात 4G च्या प्रवेशानंतर इंटरनेट स्पीडचा नवं आकाश खुलं झालं. लोकांना 4G नंतरच व्हिडिओ कॉलिंग आणि लाइव्ह स्ट्रीमिंग सारख्या हायस्पीड गोष्टींचा अनुभव घेता आला. त्याचप्रमाणे 5G नेटवर्क आल्यानंतर आपल्याला अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. भारतात भविष्यात ‘या’ नवीन तंत्रज्ञानावर धावणार वाहनं, होणार मोठा बदल वेगवान स्पीड? बर्‍याच लोकांसाठी 5G म्हणजे वेगवान इंटरनेट स्पीड असा अर्थ होतोय. हेही बऱ्याच अंशी खरं आहे. कारण, आता आपलं आयुष्य कॉलिंगच्या नाही तर डेटाच्या ट्रॅकवर चाललं आहे. अशा परिस्थितीत नेटवर्क वरील एक जनरेशन नक्कीच वेगवान इंटरनेट आणेल. 4G नेटवर्कवर आपल्याला 100Mbps पर्यंत वेग मिळतो. परंतु, 5G वर तो Gbps मध्ये उपलब्ध होईल. आपल्याला या नेटवर्कच्या वरच्या बँडमध्ये 100 पट अधिक वेग मिळवू शकतो. चांगले नेटवर्क कव्हरेज 4G आल्यानंतर कॉल्स आणि कनेक्टिव्हिटीमध्ये अनेक बदल घडले. तसेच, मागील जनरेशनच्या तुलनेत कॉल गुणवत्ता देखील सुधारली आहे. आपल्याला 5G नेटवर्कवरही कॉलिंगचा चांगला अनुभव मिळेल. कॉल ड्रॉपची समस्याही कमी होऊ शकते. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना नेटवर्क रेंज वाढवण्याचा दुसरा पर्याय मिळणार आहे. 5G नेटवर्क 4G पेक्षा 100 पट जास्त वेगवान असेल. म्हणजेच, वापरकर्त्यांना उच्च दर्जाचे व्हिडिओ, अल्ट्रा हाय रिझोल्यूशन व्हिडिओ कॉलिंग आणि इतर अनेक फायदे मिळतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात