मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Electric Vehicles: भारतात भविष्यात ‘या’ नवीन तंत्रज्ञानावर धावणार वाहनं, होणार मोठा बदल

Electric Vehicles: भारतात भविष्यात ‘या’ नवीन तंत्रज्ञानावर धावणार वाहनं, होणार मोठा बदल

Electric Vehicles: भारतात भविष्यात ‘या’ नवीन तंत्रज्ञानावर धावणार वाहनं, होणार मोठा बदल

Electric Vehicles: भारतात भविष्यात ‘या’ नवीन तंत्रज्ञानावर धावणार वाहनं, होणार मोठा बदल

Electric Vehicles Technology in India: 2030 पर्यंत, एकूण नवीन दुचाकींपैकी निम्म्या इलेक्ट्रिक दुचाकी असतील. तसेच तीनचाकी, चारचाकी वाहनांमध्ये इलेक्ट्रिकचा वाटा 25 टक्के असेल. याशिवाय 2050 पर्यंत मोठा बदल होईल.

  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 23 जुलै :  अलीकडच्या काळात भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. स्कूटर, बाईक, कार अशा वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातील ऑटोमोबाइल क्षेत्रात (Automobile Market) नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. दरम्यान अलीकडच्या काळात इलेक्ट्रीक वाहनांनी (Electric Vehicles in India) भारतातील मोठी बाजारपेठ काबीज केली आहे आणि त्यात वाढ होत आहे. 2030 पर्यंत देशात विकल्या जाणार्‍या नवीन वाहनांपैकी 30 टक्के इलेक्ट्रिक प्रवासी वाहने असतील, असा अंदाज क्लेमेंट अँड एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधनात वर्तवण्यात आला आहे. एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर कौन्सिल (CEEW) च्या अहवालात असे म्हटले आहे की, 2050 पर्यंत, विक्री झालेल्या एकूण वाहनांमध्ये इलेक्ट्रिकचा वाटा 75 टक्क्यांपर्यंत वाढेल. 2030 पर्यंत एकूण नवीन दुचाकींपैकी निम्म्या दुचाकी इलेक्ट्रिक दुचाकी असतील, असेही या अभ्यासात म्हटले आहे. त्याचप्रमाणे तीनचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये इलेक्ट्रिकचा वाहनांचा वाटा 25 टक्के असेल. भारतात 13 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी- याशिवाय, सरकारनं सांगितलं आहे की देशात 13 लाखांहून अधिक नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनं (ई-वाहने) आहेत, तर 2826 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन (PCS) कार्यरत आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. हेही वाचा- WhatsApp : तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर कोणी ब्लॉक केलं आहे का? या मार्गांनी 5 समजून घ्या ते म्हणाले की, 14 जुलै 2022 पर्यंत देशातील एकूण इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 13,34,385 आहे आणि यामध्ये आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि लक्षद्वीपच्या आकडेवारीचा समावेश नाही. यासोबतच ते म्हणाले की, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (बीईई) नुसार देशात एकूण 2826 पीसीएस कार्यरत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, अवजड उद्योग मंत्रालयाच्या फेज-II (FAME India फेज-II) मध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा जलद अवलंब आणि उत्पादन करण्याच्या योजनेंतर्गत, 68 शहरांमध्ये 2877 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन आणि 9 द्रुतगती मार्ग आणि 16 महामार्गांवर 1576 चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मंजूरी दिली गेली आहे.
First published:

Tags: Electric rickshaw, Electric vehicles, Nitin gadkari

पुढील बातम्या