मुंबई, 19 सप्टेंबर**:** 2007 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगनं केलेला कारनामा अजूनही क्रिकेट रसिकांच्या चांगलाच लक्षात आहे. इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील डरबनमधल्या त्या सामन्यात युवराजनं आजच्याच दिवशी 15 वर्षांपूर्वी इतिहास घडवला होता. युवराजनं स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकले तो क्षण क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. 2007 च्या टी20 वर्ल्ड कपमधला तोच ऐतिहासिक क्षण आपल्या मुलासोबत पाहतानाचा एक व्हिडीओ युवराजनं नुकताच शेअर केला आहे. ज्युनियर युवीसोबत खास क्षणाचं सेलिब्रेशन युवराजनं सिंगनं 15 वर्षांपूर्वीच्या विक्रमाच्या व्हिडीओचा आपल्या मुलासोबत आनंद घेतला. 19 सप्टेंबर 2007 साली युवराजनं हा कारनामा केला होता. त्याला 15 वर्ष पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन युवीनं मुलगा ओरियनसोबत केलं. त्यावेळी सहा सिक्सरचा तो व्हिडीओ ओरियन टक लावून पाहत होता. युवीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याखाली त्यानं कॅप्शन दिलंय… ’15 वर्षानंतर हा क्षण पाहताना याच्यासारखा दुसरा पार्टनर नाही…’
#OnThisDay in 2007 🗓️
— BCCI (@BCCI) September 19, 2022
@YUVSTRONG12 created history as he slammed 6️⃣ sixes in an over to register the fastest ever T20I fifty 💥💥#TeamIndia pic.twitter.com/amdqsdiNif
फ्लिंटॉफचं डिवचणं ब्रॉडला महागात 2007 साली डरबनमध्ये भारत आणि इंग्लंडमधल्या सामन्यात युवीनं अवघ्या 16 चेंडूत 58 धावा फटकावल्या होत्या. त्यात त्यानं आपलं अर्धशतक 12 चेंडूत पूर्ण केलं होतं. आजही टी20 क्रिकेटमध्ये हा विक्रम अबाधित आहे. पण युवी या सामन्यात जेव्हा मैदानात उतरला तेव्हा इंग्लंडचा अँड्र्यू फ्लिटॉफ आणि युवीमध्ये शाब्दिक चकमक झाली. पण युवीनं त्याच्या पुढच्याच ओव्हरमध्ये बॅटनं याचं जबरदस्त उत्तर दिलं. स्टुअअर्ट ब्रॉडच्या त्या ओव्हरमध्ये युवराजनं चौफेर फटकेबाजी करताना सहा बॉलमध्ये सहा सिक्स लगावले. क्रिकेटच्या इतिहासातली ती आजवरची सर्वात अविस्मरणीय इनिंग ठरली होती.