मुंबई, 8 जून : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करताना 3 विकेट्स गमावून 327 धावा केल्या. यात ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेडने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत शतकीय खेळी केली. यात ट्रॅव्हिस हेडने एक शतक आणि अर्धशतक ठोकत 163 धावा केल्या. परंतु ट्रेव्हिसच हे वादळं थांबण्यात मोहम्मद सिराजला यश आले. ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतला फलंदाज ट्रेविस हेडने फायनलच्या पहिल्या दिवशी 146 धावांवर नाबाद राहिला. त्याने 156 चेंडूत 22 चौकार आणि एक षटकार मारला. तसेच त्याने स्टिव्ह स्मिथसोबत 251 धावांची भागिदारी केली. या दोघांची भागीदारी ही भारतासाठी डोकेदुखी बनली होती. परंतु दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर सुरुवातीच्या काही ओव्हर्सनंतर कर्णधार रोहितने मोहम्मद सिराजच्या हातात बॉल सोपवला. तेव्हा 92 व्या षटकाच्या पहिल्या बॉलवर मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडची विकेट घेतली. श्रीकर भरतने हेडची कॅच पकडली. WTC Final : भारताने उतरवले IPLमधले 9 खेळाडू, ऑस्ट्रेलियाचे फक्त दोघेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताच्या गोलंदाजीच्या पहिल्या डाव्यात 91 व्या ओव्हरपर्यंत मोहम्मद सिराजला दोन विकेट घेण्यात यश आले. यापूर्वी सिराजने उस्मान ख्वाजाची देखील विकेट घेतली होती. सध्या मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडच्या घेतलेल्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.