जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final : भारताने उतरवले IPLमधले 9 खेळाडू, ऑस्ट्रेलियाचे फक्त दोघेच

WTC Final : भारताने उतरवले IPLमधले 9 खेळाडू, ऑस्ट्रेलियाचे फक्त दोघेच

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल

ऑस्ट्रेलियाने ट्रेविस हेडच्या शतकाच्या आणि स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या दिवशी 3 बाद 327 धावा केल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 जून : आयपीएलनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा थरार रंगला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या द ओव्हल मैदानावर बुधवारपासून कसोटी सामना सुरू झाला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ट्रेविस हेडच्या शतकाच्या जोरावर 3 बाद 327 धावा केल्या आहेत. भारताला सुरुवातीला 3 विकेट घेण्यात लवकर यश मिळालं, मात्र त्यानंतर ट्रेविस हेड आणि स्टिव्ह स्मिथ यांनी भारतीय गोलंदाजांना संधी दिली नाही. या सामन्यात भारताने रविचंद्रन अश्विनला संधी न दिल्यानं दिग्गजांनी रोहित शर्माला फटकारले आहे. आयपीएल गाजवणाऱ्या गोलंदाजांचीही ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर डाळ शिजली नाही. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील तब्बल 9 खेळाडू हे आयपीएलमध्ये खेळले आहेत. केवळ केएस भरत आणि चेतेश्वर पुजारा हे दोघेच आयपीएलमध्ये खेळले नाही. तर याऊलट ऑस्ट्रेलियाचे फक्त दोन खेळाडू आयपीएलमध्ये दिसले. मुंबई इंडियन्सकडून कॅमेरून ग्रीन आणि दिल्ली कॅपिटल्सकडून डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये खेळला. टीम इंडियाला ‘हेड’चं दुखणं, IPLमध्ये अनसोल्ड पण WTC Finalमध्ये करतोय धुलाई   आयपीएलमध्ये भारताचा यष्टीरक्षक केएस भरत आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे खेळले नाहीत. पुजारा आयपीएलदरम्यान इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत होता. यात त्याने धमाकेदार कामगिरी केली असून शतकही झळकावलं आहे. त्यामुळे भारतासाठी ही जमेची बाजू आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे आय़पीएलमध्ये खेळलेले खेळाडू रोहित शर्मा - मुंबई इंडियन्स शुभमन गिल, मोहम्मद शमी, - गुजरात टायटन्स विराट कोहली, मोहम्मद सिराज - आरसीबी अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, चेन्नई शार्दुल ठाकुर, उमेश यादव - केकेआर कॅमेरून ग्रीन - मुंबई इंडियन्स डेव्हिड वॉर्नर - दिल्ली कॅपिटल्स ऑस्ट्रेलियाने ट्रेविस हेडच्या शतकाच्या आणि स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या दिवशी 3 बाद 327 धावा केल्या आहेत. ट्रेविस हेड आणि स्मिथ नाबाद असून स्टिव स्मिथ शतकाच्या जवळ आहे. त्याच्या नाबाद 95 धावा झाल्या आहेत. त्याने ट्रेविस हेडसोबत 251 धावांची भागिदारी केलीय. या दोघांशिवाय डेव्हिड वॉर्नरने 43 धावा केल्या. तर लॅब्युशेन 23 धावा केल्या. उस्मान ख्वाजा शून्यावर बाद झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात