जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final : अजिंक्य रहाणेच टेस्ट क्रिकेटमध्ये जबरदस्त कमबॅक, नावावर केला मोठा विक्रम

WTC Final : अजिंक्य रहाणेच टेस्ट क्रिकेटमध्ये जबरदस्त कमबॅक, नावावर केला मोठा विक्रम

अजिंक्य रहाणेच टेस्ट क्रिकेटमध्ये जबरदस्त कमबॅक, नावावर केले अनेक विक्रम

अजिंक्य रहाणेच टेस्ट क्रिकेटमध्ये जबरदस्त कमबॅक, नावावर केले अनेक विक्रम

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचे धुरंदर फलंदाज फेल ठरले असताना तब्बल दीड वर्षांनी टीम इंडियात कमबॅक केलेलया अजिंक्य रहाणेने जबरदस्त कामगिरी केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 9 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवला जात आहे.  लंडन येथील ओव्हल मैदानावर हा सामना सुरु असून यात भारताचे धुरंदर फलंदाज फेल ठरले असताना तब्बल दीड वर्षांनी टीम इंडियात कमबॅक केलेलया अजिंक्य रहाणेने जबरदस्त कामगिरी केली आहे. याकामगिरीनंतर अजिंक्य रहाणेच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद करण्यात आली आहे. लंडन येथे सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा आज तिसरा दिवस होता. यादिवशी भारतीय संघ पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. यावेळी भारताकडून अजिंक्य रहाणे आणि श्रीकर भरत हे दोघे मैदानात उतरले. परंतु सामना सुरु होताच श्रीकरची विकेट गेल्याने टीम इंडियाला सहावा धक्का बसला. यानंतर अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. Arjun Tendulkar : WTC Final सुरु असतानाच, अर्जुन तेंडुलकरला BCCI ने दिली नवी संधी अजिंक्य रहाणेने सय्यमी खेळी करत मैदानात फटकेबाजी सुरूच ठेवली तर शार्दूल ठाकूरने देखील अजिंक्यला साथ देत अर्धशतक पूर्ण केले. अजिंक्य रहाणेने देखील तिसऱ्या दिवशी टेस्ट क्रिकेटमधील 26 वे अर्धशतकं ठोकले आणि 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. अजिंक्य रहाणे टेस्ट क्रिकेटमध्ये 5020 धावा करून अशी कामगिरी करणारा 13 वा भारतीय ठरला आहे. मात्र शतक ठोकण्यासाठी केवळ 10 धावांची आवश्यकता असताना रहाणेची विकेट गेली.

News18लोकमत
News18लोकमत

अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये फलंदाजी करताना 89 धावा केल्या. त्याने या धावा करत असताना 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला. परंतु त्याच्यानंतर भारताचा कोणताही खेळाडू अधिक काळ पिचवर टिकू शकला नाही. तिसऱ्या दिवशी भारताने 10 विकेट्स गमावून 296 धावा केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात