लंडन, 11 जून : क्रिकेटच्या मैदानात जितक्या नाट्यमय घडामोडी घडतात तितक्याच स्टेडियममध्येही घडत असतात. सामन्यावेळी कॅमेऱ्यात अशा काही घटना कैद होतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कोण जिंकणार याची उत्सुकता सर्व क्रिकेटप्रेमींना लागून राहिली आहे. स्टेडियमवर चाहत्यांनी सामना पाहण्यासाठी गर्दीही केल्याचं दिसून येतंय. दरम्यान, याच सामन्यावेळी चौथ्या दिवशी एका तरुणाने गर्लफ्रेंडला प्रपोज केलं आणि अंगठी घातली. याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावातील पाचव्या षटकावेळी अचानक एक चाहता त्याच्या जागेवरून उठला आणि त्याच्या गर्लफ्रेंडकडे वळला. तिला काही कळायच्या आतच तरुणाने अंगठी घातली. अचानक मिळालेल्या या सरप्राइजने तरुणीला सुखद धक्का बसला. यावेळी तिथे आजुबाजुला असलेल्या चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या. स्टेडियममध्ये मोठ्या स्क्रीनवर जेव्हा हे दृश्य दिसलं तेव्हा इतर चाहत्यांनी टाळ्या वाजवल्या. कमेंट्री करणाऱ्या रिकी पाँटिंगने म्हटलं की, टीव्हीवर दिसण्यासाठी स्टेडियममध्ये काही करण्याची संधी लोक सोडत नाहीत.
Proposal during WTC final
— rajendra tikyani (@Rspt1503) June 10, 2023
credits: Star Sports pic.twitter.com/VMNoW6opWj
भारत की ऑस्ट्रेलिया, WTC Final कोण जिंकणार? अखेरच्या दिवशी 3 शक्यता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला दुसऱ्या डावात 444 धावांचे अशक्यप्राय असं आव्हान दिलं आहे. चौथ्या दिवसअखेर भारताची अवस्था 3 बाद 164 अशी झाली आहे. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी 280 धावांची गरज आहे. सामना पाचव्या दिवसापर्यंत पोहोचला असून आज विजेता कोण ते ठरणार आहे.