लंडन, 11 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला दुसऱ्या डावात 444 धावांचे अशक्यप्राय असं आव्हान दिलं आहे. चौथ्या दिवसअखेर भारताची अवस्था 3 बाद 164 अशी झाली आहे. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी 280 धावांची गरज आहे. सामना पाचव्या दिवसापर्यंत पोहोचला असून आज विजेता कोण ते ठरणार आहे. पण या सामन्यात तीन शक्यता व्यक्त केल्या जातायत. जय-पराजय WTC Final जिंकण्याची संधी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांना आहे. दोन्ही संघांपैकी कुणीही हा सामना जिंकलं तरी एक इतिहास घडणार आहे. आयसीसीची प्रत्येक ट्रॉफी जिंकणारा संघ ठरणार आहे. दोन्ही संघांपैकी कोणताच संघ जिंकेल असा दावा भक्कमपणे करता येत नाही. भारताला 100 षटकात 280 धावा हव्या आहेत तर ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी 7 विकेटची गरज आहे. दोन्ही संघांमधील ही लढत रोमहर्षक अशी होणार आहे. दोन्ही संघ या परिस्थितीत सामना जिंकूही शकतात आणि गमावण्याची शक्यताही आहे. WTC Final : वादग्रस्त कॅचवर गिलची खोचक प्रतिक्रिया, ICC करणार कारवाई? ड्रॉ होण्याची शक्यता भारत आणि ऑस्ट्रेलिया सध्या सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील असतील. पण तिसऱ्या सत्रापर्यंत कशी स्थिती असेल त्यावर दोन्ही संघ विचार करू शकतात. तेव्हा किमान ड्रॉ करण्याचा विचारही केला जाऊ शकतो. यामुळे् टेस्ट चॅम्पियनशिपचे दोन्ही संघ संयुक्त विजेते ठरतील. ऑस्ट्रेलियाला विकेट घेता आल्या नाहीत आणि अखेरच्या काही षटकात सरासरी 6 ते 8 धावा प्रत्येक षटकात आवश्यक असतील तर ड्रॉ करण्याचा विचार केला जाईल. विकेट पडल्या आणि सामना वाचवायचा असेल तर भारत ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू शकतो. सामना टाय होणार? आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अनेक सामने एक किंवा दोन विकेटने जिंकल्याची उदाहरणे आहेत. अखेरच्या षटकातही सामन्याचा निकाल लागला आहे. त्यामुळे असं झालं तर WTC Final टाय होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अखेरच्या दिवशी शेवटच्या चेंडूपर्यंत भारतीय संघ 343 धावा करण्यात यशस्वी झाला तर सामना टाय होईल. मात्र कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोनच सामने टाय झाले आहेत. यात एक सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1986 मध्ये टाय झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.