जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / गिल Out की Not Out? वाचा ग्रीनने घेतलेल्या कॅचबद्दल काय आहे नियम

गिल Out की Not Out? वाचा ग्रीनने घेतलेल्या कॅचबद्दल काय आहे नियम

शुभमन गिलच्या कॅचवरून वाद

शुभमन गिलच्या कॅचवरून वाद

WTC Final : थर्ड अंपायरने गिलला झेलबाद ठरवून चूक केली का? कॅमेरून ग्रीनने गिलचा झेल घेतला तो वैध होता का? MCCचे नियम काय सांगतात? हे पाहूया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

लंडन, 11 जून : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ओव्हलवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू आहे. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा शुभमन गिल 18 धावांवर बाद झाला. शुभमन गिलच्या विकेटवरून सध्या क्रिकेट विश्वात वाद सुरू आहे. थर्ड अंपायरनी त्याला ज्या पद्धतीने आऊट दिलं त्यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिग्गजांनीसुद्धा शुभमनला चुकीचं बाद दिल्याचं म्हटलंय. सोशल मीडियावरही शुभमन गिलच्या विकेटची चर्चा आहे. थर्ड अंपायरने गिलला झेलबाद ठरवून चूक केली का? कॅमेरून ग्रीनने गिलचा झेल घेतला तो वैध होता का? असे प्रश्न विचारले जात आहेत. क्रिकेटच्या नियमानुसार कॅच योग्य होता का? MCCचे नियम काय सांगतात? हे पाहूया. भारत की ऑस्ट्रेलिया, WTC Final कोण जिंकणार? अखेरच्या दिवशी 3 शक्यता शुभमन गिलने कर्णधार रोहित शर्मासोबत भारताच्या डावाची सुरुवात चांगली केली होती. तो 18 धावांवर खेळत होता. तेव्हा स्कॉट बोलंडचा ऑफ स्टम्प बाहेर जाणाऱ्या चेंडूला शुभमनने फटकावण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये असणाऱ्या कॅमेरून ग्रीनकडे गेला. कॅमेरून ग्रीनने झेप घेत एका हाताने चेंडू पकडला. पण शुभमन गिलला चेंडू जमिनीला लागल्याची शंका आली आणि तो मैदानातच थांबला. मैदानावरील पंचांनी थर्ड अंपायरची मदत घेतली. वेगवेगळ्या अँगलने पाहिल्यानंतर टीव्ही अंपायर रिचर्ड कॅटलबेरो यांनी गिलला बाद ठरवलं. झेल पकडताना चेंडू जमिनीला लागला नव्हता आणि ग्रीनची बोटं चेंडूच्या खाली होती. त्यामुळे गिलला बाद दिलं. पंचांच्या या निर्णयावर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज शुभमन गिल दोघेही नाराज दिसले. त्यावेळी रोहित शर्माने पंचांशी चर्चाही केली. शुभमन गिलच्या या कॅचवरून स्टेडियमपासून ते सोशल मीडियापर्यंत चर्चा झाली. गिलला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचं भारतीय चाहत्यांनी म्हटलं. भारताचे माजी प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्रींनीही या निर्णयावर बोलताना इथे जर स्टिव्ह स्मिथ असता तर बाद दिलं नसतं असं म्हटलं. WTC Final : वादग्रस्त कॅचवर गिलची खोचक प्रतिक्रिया, ICC करणार कारवाई?   MCCने कॅच बाबत तयार केलेले काही नियम आहेत. त्यापैकी 33.2.1 नुसार, चेंडू किंवा कोणत्याही वेळी चेंडू फिल्डरच्या हातात असेल तेव्हा कॅच पूर्ण होण्याआधी तो सीमारेषेबाहेर नसेल तर तो झेल मानला जातो. जर चेंडू फिल्डरच्या हातात असेल आणि हात जमीनीला लागला असेल किंवा चेंडू शरीराच्या कोणत्याही भागाला चिकटला असल्यास, कोणत्याही प्रोटेक्टिव गिअरमध्ये अडकला असेल तर तो झेल ठरतो आणि फलंदाजाला बाद दिलं जातं. नियमानुसार झेल घेण्याची प्रक्रिया तेव्हा सुरू होते जेव्हा चेंडू फिल्डरच्या हातात असेल आणि तेव्हाच संपेल जेव्हा फिल्डरने चेंडू आणि त्याच्या हालचालींवर पूर्ण नियंत्रण मिळवले असेल. कॅमेरून ग्रीनने झेल घेतला तेव्हा त्याची बोटं चेंडूच्या खाली होती असं थर्ड अंपायरने म्हटलंय. ग्रीनने चेंडू पकडला होता पण जेव्हा त्याने हात वरती उचलला तेव्हा चेंडू जमिनीला लागल्यासारखं वाटतं आणि यामुळेच त्याने घेतलेल्या कॅचवरून वाद निर्माण झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात