मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /धमकी देणाऱ्या त्या पत्रकाराचं नाव काय? ऋद्धीमान साहाने दिलं उत्तर

धमकी देणाऱ्या त्या पत्रकाराचं नाव काय? ऋद्धीमान साहाने दिलं उत्तर

 टीम इंडियाचा विकेट कीपर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एका पत्रकाराने साहाला मुलाखत देण्यासाठी धमकी दिली, याचे व्हॉट्सऍप चॅट साहाने सोशल मीडियावर टाकले.

मुंबई, 22 फेब्रुवारी : टीम इंडियाचा विकेट कीपर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एका पत्रकाराने साहाला मुलाखत देण्यासाठी धमकी दिली, याचे व्हॉट्सऍप चॅट साहाने सोशल मीडियावर टाकले. त्याच्या या ट्वीटनंतर वीरेंद्र सेहवागपासून रवी शास्त्री यांनी साहाला पाठिंबा दिला, तसंच अनेक चाहत्यांनी साहाला त्या पत्रकाराचं नाव जाहीर करण्याची मागणी केली. बीसीसीआयनेही (BCCI) साहाला त्या पत्रकाराचं नाव सांग, ज्यामुळे त्याच्यावर कारवाई करता येईल, असं सांगितलं. या सगळ्या प्रकरणानंतर ऋद्धीमान साहाने अखेर प्रतिक्रिया दिली आहे.

'मी नाराज झालो होतो, अशा प्रकारची वागणूक सहन करता कामा नये, असा माझा विचार होता. दुसऱ्या कोणालाही असा त्रास व्हावा ही माझी इच्छा नाही, त्यामुळे मी हे चॅट लोकांना दाखवण्याचा निर्णय घेतला, पण मी त्याचं नाव सांगणार नाही. कोणाचं करियर संपावं एवढं कोणाचं नुकसान करू नये, असा माझा स्वभाव आहे. माणुसकी म्हणून आणि त्याच्या कुटुंबाकडे पाहून मी त्याचं नाव जाहीर करणार नाही, पण परत असं झालं तर मग मी मागे हटणार नाही,' असं साहा त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला आहे.

याचसोबत ऋद्धीमान साहाने पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले. साहाने हे ट्वीट केल्यानंतर सेहवाग, रवी शास्त्री, गौतम गंभीर, आकाश चोप्रा, प्रग्यान ओझा, इरफान पठाण हे खेळाडू पाठिंब्यासाठी समोर आले. तसंच बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण धूमळ यांनीही साहाकडून या ट्वीटबाबत माहिती घेतली, पण आता साहानेच पत्रकाराचं नाव सांगायला नकार दिला आहे.

भारताकडून 40 टेस्ट खेळणाऱ्या ऋद्धीमान साहाला श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी (India vs Sri Lanka) टीम इंडियात स्थान देण्यात आलेलं नाही. टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी आपल्याला निवृत्ती घेण्याबाबत विचार करायला सांगितलं होतं, असंही साहा म्हणाला होता.

First published:

Tags: Team india