मुंबई, 05 मार्च : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा १४३ धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना हरमनप्रीत कौरच्या ६५ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातसमोर २०८ धावांचे आव्हान ठेवले होते. पण गुजरातच्या संघाला ६४ धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातची कर्णधार बेथ मूनी अवघे तीन चेंडू खेळल्यानतंर दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन मैदानातून बाहेर गेली. यामुळे गुजरातला मोठा धक्का बसला. गुजरात जायंट्स अवघ्या ६४ धावाच करू शकले. मुंबई इंडियन्सकडून या सामन्यात फिरकीपटू सायका इशाके हिने चार विकेट घेत कमाल केली. सायकाने ३.१ षटकात ४ विकेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सांगलीत मुलींना नेट्समध्ये खेळताना पाहून स्मृती का थक्क झाली? पाहा VIDEO महिला प्रीमियर लीगमध्ये हरमनप्रीतच्या फलंदाजीनंतर सायकाच्या गोलंदाजीचा जलवा दिसून आला. २७ वर्षांची असलेली सायका ही बंगालची फिरकी गोलंदाज आहे. तिने क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात कालीघाट क्लब क्रिकेटमधून केली होती. तिने अंडर १९ आणि अंडर २३ स्पर्धेत बंगालचे प्रतिनिधित्व केलं. २०२१, २०२२ मध्ये सायकाने इंडियन वुमन डी आणि इंडिया एचे प्रतिनिधित्व केले होते. फक्त गोलंदाजीच नव्हे तर स्फोटक अशा फलंदाजीसाठीसुद्धा ती ओळखली जाते. इंडिया सी कडून २०२१ मध्ये खेळताना तिने एका सामन्यात २४ धावांची खेळी केली होती. यात ५ चौकार लगावले होते. त्या स्पर्धेत सायका फक्त एकदाच बाद झाली होती. त्यानंतर २०२२ मध्ये सायकाने इंडिया ए संघाकडून जबरदस्त खेळ केला होता. यानंतर महिला टी२० चॅलेंज २०२२ मध्ये तिला ट्रेलब्लेजर्सकडून खेळण्याची संधी मिळाली होती. अद्याप तिला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.