जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सांगलीत मुलींना नेट्समध्ये खेळताना पाहून स्मृती का थक्क झाली? पाहा VIDEO

सांगलीत मुलींना नेट्समध्ये खेळताना पाहून स्मृती का थक्क झाली? पाहा VIDEO

smriti mandhana

smriti mandhana

महिला प्रीमियर लीगमधली सर्वात महागडी खेळाडू स्मृती मानधनाने पहिल्या सामन्याआधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तिने मुलींच्या क्रिकेटबाबत सांगलीतला एक किस्सा सांगितला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05 मार्च : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात झालीय. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झाला. या सामन्याआधी महिला प्रीमियर लीगमधली सर्वात महागडी खेळाडू स्मृती मानधनाने पत्रकारांशी संवाद साधला. स्मृती मानधनाकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे. महिला प्रीमियर लीगबाबत स्मृती मानधनाला काय वाटतं असा प्रश्न विचारण्यात आलं होतं. या लीगमुळे मुंबई, पुण्याशिवाय इतर लहान शहरातील मुलींना किती फायदा होईल या प्रश्नावर तिने उत्तर दिलं. मुलींच्या मनातही क्रिकेट खेळण्याची इच्छा निर्माण व्हावी अशी अपेक्षा स्मृती मानधनाने व्यक्त केली. ती म्हणाली की, गेल्या चार पाच वर्षात जितक्या मुली क्रिकेट खेळायला लागल्या आहेत ते पाहून खुप आनंद होतो. मुलींनी क्रिकेट खेळावं आणि त्यांच्या आदर्श खेळाडूप्रमाणे बनण्याची त्यांच्यात इच्छा निर्माण व्हावी असं वाटतं. मुली आता क्रिकेट खेळतात आणि हे आता घडतंय. IPL अन् WPLच्या पहिल्या सामन्यात 15 वर्षांचे अंतर, दोन्हीत घडलेत 7 योगायोग स्मृतीने सांगलीत गेल्यानंतरचा अनुभवही शेअर केला. तिने म्हटलं की, मी जेव्हा सांगलीला जाते तेव्हा पाहते की अंडर 14 मुलांचे सामने सुरू असतात आणि त्यातल्या प्रत्येक संघात चार मुली त्यांच्यासोबत खेळत असताना दिसतात. मुलांच्या स्पर्धेत मुलींना खेळताना पाहण्यासाठी मी सराव थोडावेळ पुढं ढकलते. त्यांना पाहताना अभिमान वाटतो.

महिला प्रीमियर लीगचा तळागाळातील मुलींचसाठी कसा फायदा होईल? असे विचारले असता स्मृती मानधनाने सांगितले की, अनेक मुली बॅट, बॉल घेऊन प्रोफेशनल क्रिकेट खेळतात हे समाधानकारक आहे. भारतीय लोकही आता मुली क्रिकेट खेळतात हे स्वीकारल्याचं सकारात्मक चित्र आहे. महिला प्रीमियर लीगमुळेही याला आणखी प्रोत्साहन मिळेल. मुलीही आता स्वप्न पाहतील की महिला प्रीमियर लीगमध्ये खेळायचंय आणि भारतासाठी खेळायचंय. मला खात्री आहे की यातून त्यांना बळ मिळेल असा विश्वास स्मृतीने व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात