मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WPL 2023 : मुंबईच्या इस्सी वोंगने केली कमाल! WPL 2023 मध्ये घेतली पहिली हॅट्रिक

WPL 2023 : मुंबईच्या इस्सी वोंगने केली कमाल! WPL 2023 मध्ये घेतली पहिली हॅट्रिक

मुंबईच्या इस्सी वॉंगने केली कमाल! WPL 2023 मध्ये घेतली पहिली हॅट्रिक

मुंबईच्या इस्सी वॉंगने केली कमाल! WPL 2023 मध्ये घेतली पहिली हॅट्रिक

भारतात सुरु असलेल्या महिला प्रेमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईची धाकड गोलंदाज इस्सी वॉंगने इतिहास रचत WPL 2023 मध्ये पहिली हॅट्रिक घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 मार्च : भारतात सुरु असलेल्या महिला प्रेमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 72 धावांनी यूपी वॉरियर्सवर विजय मिळवला असून यासोबतच त्यांनी थेट महिला आयपीएलच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. या सामन्यात मुंबईची धाकड गोलंदाज इस्सी वोंगने इतिहास रचत WPL 2023 मध्ये पहिली हॅट्रिक घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर मुंबई विरुद्ध यूपी वॉरियर्स या संघात महिला प्रीमियर लीगचा सेमी फायनल सामना पारपडला . या सामन्यात सुरुवातीला मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी यूपी वॉरियर्सने मुंबईच्या संघाला 20  षटकात 4 विकेट्स घेऊन 182 धावांवर रोखले. यावेळी मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 14, यस्तिका भाटिया हिने 21 तर नॅट सायव्हर-ब्रंट हिने सर्वाधिक 72 धावा करून संघासाठी मोलाचे योगदान दिले. यासोबतच मुंबईने यूपी वॉरियर्सला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले होते.

WPL 2023 : मुंबई इंडियन्सची फायनलमध्ये धडक! यूपी वॉरियर्सचा दारुण पराभव

विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या घातक गोलंदाजी समोर यूपीच्या फलंदाजांनी  लोटांगण घातले. यूपीची फलंदाज किरण नवगिरे ही मुंबईसाठी धोकादायक ठरत असतानाच 13 व्या षटकात इस्सी वोंगने तिची विकेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर इस्सीने सिमरन शेखला क्लीन बोल्ड करून तिसऱ्या चेंडूवर सोफी एक्लेस्टोनची देखील विकेट घेतली. यासह इस्सी वोंगने लागोपाठ तीन विकेट घेऊन हॅट्रिक पूर्ण केली. अशी कामगिरी करणारी इस्सी वोंग ही महिला आयपीएलमधली पहिली खेळाडू ठरली. अखेर मुंबईने 18 व्या षटकात यूपीच्या संघाचा डाव गुंडाळला आणि 110 धावांवर त्यांना ऑल आऊट केले. यासह मुंबईच्या संघाने सामना जिंकून थेट फायनलमध्ये धडक दिली.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, IPL 2023, Mumbai Indians