मुंबई, 18 मार्च : महिला प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात सामना पारपडला. नेरुळच्या डी वाय पाटील स्टेडियमवर पारपडलेल्या या सामन्यात यूपी वॉरियर्सने 5 विकेट्सने सामना जिंकून मुंबई संघाला पराभवाची धूळ चारली. यासह महिला आयपीएलमध्ये मुंबईचा हा पहिलाच पराभव ठरला. परंतु या सामन्यात यूपीकडून सलामीसाठी आलेल्या देविका वैद्यचा शानदार कॅच घेऊन हरमनप्रीतने तिला बाद केले. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यूपी वॉरियर्सने सामन्यात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यात यूपीच्या गोलंदाजांनी मुंबई संघाला 128 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर विजयासाठी 129 धावांचे आव्हान असताना यूपीच्या संघाकडून देविका वैद्य आणि अलिसा हिली या दोघी जणी मैदानात आल्या. विजयासाठी सोपं आव्हान दिल्यामुळे मुंबई इंडियन्सला लवकरात लवकर यूपी वॉरियर्सच्या विकेट घेणं गरजेचं होत. तेव्हा हरमनप्रीत कौरने चोख फिल्डिंग लावून देविका वैद्यच्या रूपाने यूपी वॉरियर्सची पहिली विकेट घेतली. यावेळी हरमनप्रीतने देविकाचा शानदार कॅच पकडला.
WHAT. A. CATCH 🔥🔥@mipaltan wanted an early wicket and they have got one, courtesy of a sharp catch from captain @ImHarmanpreet 👏👏
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 18, 2023
Follow the match ▶️ https://t.co/6bZ3042C4S #TATAWPL | #MIvUPW pic.twitter.com/5ArBZjTxRq
हरमनप्रीतने हा कॅच घेण्यासाठी हवेत उडी मारली आणि काही सेकंदाच्या आतच तिचा कॅच घेतला. यामुळे सलामीसाठी आलेल्या देविका वैद्यला अवघी 1 धाव करून बाद व्हावे लागले.