मुंबई, 18 मार्च : महिला प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई संघाला पराभवाचा धक्का दिला असून यूपी संघाने हा सामना 5 विकेट्सने जिंकला. महिला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा हा पहिलाच पराभव ठरला. महिला आयपीएलमध्ये आज शनिवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात रोमांचक सामना पारपडला. या सामन्यात सुरुवातीला फलंदाजीसाठी हरमनप्रीत कौरचा मुंबई संघ मैदानात उतरला. यावेळी यूपी संघातील गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईचे फलंदाज संघ फार काळ तग धरू शकले नाहीत. हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यूज, एसी वोंग वगळता इतर कोणत्याही खेळाडूला दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. त्यामुळे अखेर 20 षटकात 127 धावांवर मुंबईचा संघ ऑल आऊट झाला.
मुंबईने विजयासाठी यूपी वॉरियर्सला 128 धावांच आव्हान दिल होत. हे आव्हान यूपी वॉरियर्सने 3 चेंडू आणि 5 विकेट्स शिल्लक ठेऊन पूर्ण केलं. अटीतटीच्या या सामन्यात ग्रेस हॅरिस हिने संघासाठी 39 तर ताहलिया मॅकग्रा हिने 38 धावा केल्या. तर दीप्ती शर्मा 14 चेंडूत 13 धावा आणि सोफी एक्लेस्टोनने 17 चेंडूत 16 धावा करून नाबाद राहिल्या. शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्सचा संघ सामन्यात बाजी मारेल असे वाटत असतानाच यूपीच्या फलंदाजाने षटकार ठोकून सामना जिंकला. यूपी वॉरियर्सच्या दीप्ती शर्माला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.