मुंबई, महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्लीने शेवटच्या साखळी सामन्यात युपी वॉरिअर्सला नमवून थेट फायनल गाठली आहे. गुणतालिकात धावगतीच्या जोरावर दिल्लीने बाजी मारली. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांचे प्रत्येकी ८ गुण आहेत. मात्र, मुंबईपेक्षा दिल्लीची धावगती जास्त असल्यानं ते थेट फायनलमध्ये पोहोचले.
दिल्लीने थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवल्यानं त्यांना आता एलिमिनिटरचा सामना खेळावा लागणार नाही. दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरिअर्स यांच्यात अंतिम फेरी गाठण्यासाठी २४ मार्च रोजी नॉकआऊटचा सामना होणार आहे.
IPL 2023 : आयपीएलचं थ्रील आणखी वाढणार, नवे नियम ठरणार गेम चेंजर!
अखेरच्या साखळी सामन्यात युपी वॉरिअर्सने प्रथम फलंदाजी करताना १३९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा यांनी अर्धशतकी भागिदारी केली. शफाली बाद झाल्यानंतर जेमिमाह आणि मेग लॅनिंग लागोपाठ बाद झाल्या. यानंतर मारिजन कॅप आणि एलिस कॅप्सी यांनी ५० धावांची भागिदारी करत दिल्लीला विजयापर्यंत पोहोचवलं. एलिस कॅप्सी ३४ धावांवर बाद झाली. त्यानंतर मारिजन कॅपने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
तत्पूर्वी दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. युपी वॉरिअर्सकडून ताहिला मॅकग्राने ३२ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या. तिच्याशिवाय एलिसा हिलीने ३६ तर श्वेता सेहरावतने १९ आणि सिमरन शेखने ११ धावा केल्या. इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.