मुंबई, 05 मार्च : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाला दणक्यात सुरुवात झालीय. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सवर तब्बल १४३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ५ विकेट गमावत २०७ धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार हरमनप्रीत कौरचं अर्धशतक आणि हिली मॅथ्यूज, अमेलिया केर यांनी तुफान फटकेबाजी केली. प्रत्युत्तरादाखल खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातचा डाव गडगडला. २३ धावात त्यांचे ७ फलंदाज बाद झाले होते. शेवटी त्यांचा डाव ६४ धावात संपुष्टात आला. आयपीएलमध्ये पहिला सामना १८ एप्रिल २०१८ रोजी झाला होता. त्यानंतर १५ वर्षांनी महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना झाला. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पहिला सामना झाला होता. त्यात ब्रँडन मॅक्युलमच्या १५८ धावांच्या जोरावर केकेआरने १४० धावांनी सामना जिंकला होता. WPL 2023 : पहिली विकेट ते पहिलं अर्धशतक, पहिल्या वहिल्या WPLचे HighLights आय़पीएल आणि WPLमधले 7 योगायोग - आयपीएलचा पहिला सामना आणि महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना यात बरेच योगायोग घडले आहेत. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आताही असंच घडलं आहे. - धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांचा डाव दोन्ही वेळा १५.१ षटकात संपुष्टात आला. - आयपीएल आणि WPLमध्ये पहिल्या सामन्यात धावांचा पाठलाग करणारा संघ शंभर धावाही करू शकला नाही. - दोन्ही वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी १४० पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवला. - आयपीएलच्या पहिल्या सामन्यात टॉप स्कोरर मॅक्युलमचा स्ट्राइक रेट २१६ इतका होता. तर महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यातील टॉप स्कोरर हरमनप्रीतचा स्ट्राइक रेटसुद्धा २१६ इतका होता. - दोन्ही लीगमध्ये पहिल्या सामन्यात विजेत्या संघाने नाणेफेक गमावली होती. त्यानंतर त्यांना प्रथम फलंदाजीला पाचारण करण्यात आले होते. - आरसीबीचा संघ ८२ धावांवर सर्वबाद झाला होता. या सामन्यात मॅक्युलमने काढलेल्या धावांपेक्षा या धावा कमी होत्या. WPLमध्येही हरमनप्रीतने काढलेल्या ६५ धावांपेक्षा कमी धावांवर गुजरातचा संघ बाद झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.