मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

World Test Championship : ठरलं! या मैदानात होणार फायनल, गांगुलीकडून शिक्कामोर्तब

World Test Championship : ठरलं! या मैदानात होणार फायनल, गांगुलीकडून शिक्कामोर्तब

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचं (World Test Championship Final) स्टेडियम अखेर ठरलं आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जूनमध्ये साऊथम्पटनमध्ये ही फायनल खेळवली जाईल. आयसीसीने (ICC) याबाबत घोषणा केली नसली तरी बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) मात्र यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

कोलकाता, 8 मार्च : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचं (World Test Championship Final) स्टेडियम अखेर ठरलं आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जूनमध्ये साऊथम्पटनमध्ये ही फायनल खेळवली जाईल. सुरूवातीला ही मॅच लॉर्ड्सवर होईल, असं सांगण्यात येत होतं, पण कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंची सुरक्षा पाहता फायनलचं ठिकाण बदलण्यात आलं. आयसीसीने (ICC) याबाबत घोषणा केली नसली तरी बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) मात्र यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

इंडिया टुडेशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, 'फायनल साऊथम्पटनमध्ये होईल. हा निर्णय खूप आधी घेण्यात आला आहे. कोरोनामुळे हे ठरवण्यात आलं. कारण मैदानाजवळच हॉटेल आहे. कोरोनानंतर इंग्लंडने इकडेच बहुतेक मॅच खेळवल्या.'

वनडे वर्ल्ड कपची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपशी तुलना केली असता दादा म्हणाला, प्रत्येकाची आपली खासियत असते. कोरोनामुळे यामध्ये अडचणी आल्या. आम्हा सगळ्या टीमना समान मॅच खेळायच्या होत्या. सौरव गांगुली टीम इंडियाच्या मागच्या 6 महिन्यांच्या कामगिरीवर समाधानी दिसला. मागच्या सहा महिन्यांपासून खेळाडू बायो-बबलमध्ये आहेत. फायनलमध्ये आम्ही न्यूझीलंडला हरवू, असा विश्वास दादाने व्यक्त केला. एवढच नाही तर ऑस्ट्रेलियातल्या टीम इंडियाचं कामगिरीचंही त्याने कौतुक केलं. कोहली आणि रहाणेला शुभेच्छा, ब्रिस्बेनमध्ये पंतची खेळीही शानदार होती, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली.

मागच्यावर्षी जेव्हा कोरोना उच्चांकावर होता तेव्हा साऊथम्पटनमध्ये इंग्लंड वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध खेळली होती.

आयपीएलमध्ये टीम इंडियाचे सगळे खेळाडू खेळतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या तयारीसाटी खेळाडूंना योग्य वेळ दिला जाईल. त्यासाठी आयपीएलची फायनल 30 मे रोजी होणार आहे. स्पर्धेची लीग स्टेज सहा ठिकाणी होईल.

First published:

Tags: BCCI, Icc, Sourav ganguly, Team india