लंडन, 14 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर आता क्रिकेट विश्वात वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, न्यूझीलंड संघाला आता मोठा धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू क्रिकेटर मायकल ब्रेसवेल दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकणार आहे. दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडणारा ब्रेसवेल हा न्यूझीलंडचा दुसरा खेळाडू आहे. त्याच्याआधी कर्णधार केन विल्यम्सन लिगामेंट सर्जरीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. विल्यम्सनला आयपीएलवेळी दुखापत झाली होती. क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार आहे. ब्रेसवेलला गेल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये टी20 स्पर्धेवेळी दुखापत झाली होती. शुक्रवारी वार्सेस्टरशायरकडून खेळताना यॉर्कशायरविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे तो 11 धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन परतला होता. त्यानंतर त्याच्या दुखापतीची तपासणी केली असता ती गंभीर असल्याचं समोर आलं. ओह कॅप्टन, माय कॅप्टन! धोनी IPLमधून रिटायर होणार? CSKच्या VIDEOने वाढवली धाकधूक दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेल्या ब्रेसवेलवर ब्रिटनमध्ये गुरुवारी ऑपरेशन करण्यात येणार आहे. यामुळे त्याला सहा ते आठ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर रहावं लागेल. त्यामुळे तो वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅर स्टेड यांनी ब्रेसवेलच्या दुखापतीमुळे संघाला मोठा धक्का बसला असल्याचं म्हटलंय. ब्रेसवेल दुखापतीतून सावरेल आणि लवकरच पुनरागमन करेल असं म्हटलं. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यांना फायनलमध्ये इंग्लंडने हरवून विजेतेपद पटकावलं होतं. मायकल ब्रेसवेलने न्यूझीलंडकडून आतापर्यंत ८ कसोटी, 19 एकदिवसीय आणि 16 टी20 सामने खेळले आहेत. मर्यादित क्रिकेटमध्ये सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटर अशी त्याची ओळख आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 510 धावा केल्या असून 15 विकेट घेतल्या आहेत. तर टी20 मध्ये त्याने 113 धावा आणि 21 विकेट घेतल्या आहेत. कसोटीत 259 धावा आणि 26 विकेट घेण्याची कामगिरी त्याने केलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.