नवी दिल्ली, 25 मार्च : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने आणखी एक गोल्ड मेडलला गवसणी घातली आहे. 81 किलो वजनी गटामध्ये स्विटी बोराने गोल्डन पंच लगावला आहे. स्विटीने 4-3 ने सामना जिंकला आहे. स्विटीने चीनच्या बॉक्सरला धूळ चारत गोल्ड मेडल पटकावले आहे. नीतू घंघासने पाठोपाठ स्विटी बोराने सुद्धा गोल्डन कामगिरी करून आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. 81 किलो वजनी गटात चीनच्या वांग लीना हिला हरवून स्विटीने गोल्ड मेडल पटकावले आहे. स्विटीने हा सामना 4-3 अशा फरकाने जिंकला. स्विटीने पहिल्या फेरीपासूनच चिनी बॉक्सरवर आपलं वर्चस्व राखलं होतं. पहिल्या फेरीतच तिने जोरदार पंच लगावत देशी हिसका दाखवला होता. पहिली फेरी 3-2 अशी जिंकली.
𝐒𝐄𝐂𝐎𝐍𝐃 𝐆𝐎𝐋𝐃 🥇 𝐅𝐎𝐑 𝐈𝐍𝐃𝐈𝐀 🇮🇳
— Doordarshan Sports (@ddsportschannel) March 25, 2023
SAWEETY BOORA beat Lina Wang of China in the FINAL 🥊#WorldChampionships #WWCHDelhi #Boxing #WBC2023 #WBC @saweetyboora @BFI_official @Media_SAI @kheloindia pic.twitter.com/TUHqBhfUvf
त्यानंतर दुसऱ्या फेरीतही स्विटी बोराने सावध सुरुवात केली. चीनची बॉक्सर वांग लीनाविरुद्ध एक एक पाऊल टाकत सावध भूमिका घेतली. त्यामुळे तिने आक्रमकपणे हल्ला चढवला. पण स्विटी काही मागे हटली नाही. आणि तिने जोरदार ठोसे लगावत 3-2 अशा फरकाने दुसरी फेरी सुद्धा जिंकली. त्यानंतर अंतिम फेरीत चिनी बॉक्सरला तिने संधीच दिली नाही. तिने आक्रमकपणे हल्ला चढवल्यामुळे पंचाने दिला ताकीद दिली. पण शेवटच्या क्षणी तिने सामना फिरवला. नीतू घंघासने सुद्धा पटकावले गोल्ड मेडल दरम्यान, नीतू घंघासने शनिवारी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत मंगोलियाच्या लुत्साईखान अल्तानसेटसेगचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या इतिहासात सुवर्णपदक जिंकणारी ती सहावी भारतीय महिला बॉक्सर ठरली आहे.
अंतिम फेरीत नीतू सुरुवातीपासूनच वरचढ ठरत होती. पहिली फेरी 5-0 ने जिंकल्यानंतर नीतूने लुत्सेखानला दुसऱ्या फेरीत पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. दुसरी फेरी नीतूने 3-2 अशी जिंकली. तर तिसऱ्या फेरीत देखील नीतूने चांगले कसब दाखवून विजय मिळवला. नीतू घंघास ही 22 वर्षीय असून तिचे हे पहिले विश्वविजेतेपद आहे. नीतूने सेमी फानयलमध्ये कझागिस्तानची बॉक्सर अलुआ बाल्कीबेकोवा हिचा 5-2 असा पराभव केला होता. 9 वर्षांपूर्वी स्विटीने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आता गोल्ड मेडल जिंकून तिने 9 वर्षांची कसर भरून काढली आहे.