मुंबई, 23 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज गुरुवारी सेमीफायनाचा पहिला सामना पारपडणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन बलाढय संघांमध्ये फायनल गाठण्यासाठी लढत होणार असून यापैकी एक संघ आज सामना जिंकून थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. परंतु या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. Womens T20 WC : फायनल गाठण्यासाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाच तगड आव्हान भारताची स्टार गोलंदाज पूजा वस्त्राकर आजारपणामुळे सेमी फायनल सामन्यातून बाहेर पडकली आहे. महिला काही दिवसांपासून पूजा ही आजारी असल्याची माहिती मिळत होती. परंतु आता बीसीसीआयने अखेर याची अधिकृत माहिती दिली आहे.
UPDATE 🚨 - Pacer Pooja Vastrakar has been ruled out due to an upper respiratory tract infection!
— BCCI Women (@BCCIWomen) February 23, 2023
The Event Technical Committee of the ICC Women’s T20 World Cup 2023 has approved @SnehRana15 as a replacement for Pooja Vastrakar in the India squad! #T20WorldCup | #TeamIndia pic.twitter.com/NKiTvp22Hn
बीसीसीआयच्या सांगण्यानुसार, पूजा हिला अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे ती ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात भारताच्या प्लेयिंग 11 मध्ये खेळू शकणार नाही. तिच्या ऐवजी स्नेह राना हिला संधी देण्यात आली आहे.