मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Womens T20 WC : फायनल गाठण्यासाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाच तगड आव्हान

Womens T20 WC : फायनल गाठण्यासाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाच तगड आव्हान

फायनल गाठण्यासाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाच तगड आव्हान

फायनल गाठण्यासाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाच तगड आव्हान

उद्या गुरुवारी 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमी फायनाचा सामना रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडवर हा सामना खेळवला जाणार असून यात भारतीय महिला संघाला आपला सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स दाखवावा लागेल.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये उद्या गुरुवारी सेमीफायनाचा पहिला सामना पारपडणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन बलाढय संघांमध्ये फायनल गाठण्यासाठी लढत होणार असून यापैकी एक संघ उद्या सामना जिंकून थेट फायनलमध्ये  प्रवेश करेल. परंतु भारताला फायनल गाठण्यासाठी तब्बल पाच वेळा महिला टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच तगडं आव्हान असणार आहे.

उद्या गुरुवारी 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमी फायनाचा सामना रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडवर हा सामना खेळवला जाणार असून यात भारतीय महिला संघाला आपला सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स दाखवावा लागेल. सेमी फायनलसाठी भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मध्ये काही बदल होण्याची देखील शक्यता आहे. आतापर्यंत यंदाच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने 4 सामने खेळले असून एकही सामना गमावलेला नाही. तर भारताने 4 ग्रुप स्टेज सामने खेळले असून यापैकी इंग्लंड विरुद्धचा सामना भारताने 11 धावांनी गमावला होता.

कधी होणार सामना :

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 23 फेब्रुवारी रोजी सेमी फायनाचा सामना रंगणार असून या सामन्याला सायंकाळी 6:30 वाजता सुरु होईल. सामन्यापूर्वी अर्धातास आधी दोन्ही संघांमध्ये नाणेफेक पारपडेल.

कुठे पाहाल सामना :

आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपचा पहिला सेमी फायनल मुकाबला स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर दाखवला जाईल. तसेच या सामन्याचे थेट प्रक्षेपण डिझनी + हॉटस्टार ओटीटी तसेच अँपवर सुरु राहिल.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, ICC Women T20 World Cup, Smruti mandhana, Sports