जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Womens T20 WC : दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले, भारताकडे आज शेवटची संधी

Womens T20 WC : दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले, भारताकडे आज शेवटची संधी

india womens

india womens

पाकिस्तान अखेरचा सामना जिंकल्यास भारताला मागे टाकून सेमीफायनलमध्ये पोहचू शकेल. कारण त्यांची धावगती भारतापेक्षा सरस आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

केपटाऊन, 20 फेब्रुवारी : महिला टी२० वर्ल्ड कप २०२३ मध्ये गट फेरीतील सामने अखेरच्या टप्प्यात आहेत. मात्र आतापर्यंत केवळ दोनच संघांनी सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. यातील एका संघाने रविवारी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आयसीसीने सोमवारी घोषणा केली की, पाच वेळा विजेता असलेल्या ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडचा संघही सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. इंग्लंड बी ग्रुपमध्ये असून भारतही याच गटात आहे. भारत अजूनही सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत आहे. भारताचा आज गट फेरीतला अखेरचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. जर या सामन्यात भारताने विजय मिळवला तर सेमीफायनलमध्ये पोहोचणारा भारत तिसरा संघ ठरेल. भारतीय संघाला महिला टी२० वर्ल्ड कपची सेमीफायनल गाठायची असेल तर कोणत्याही परिस्थिती टीम इंडियाला विजय मिळवावा लागेल. भारताने हा सामना जिंकला तर ६ गुण होतील आणि इंग्लंडसोबत सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित होईल. जर भारत पराभूत झाला तर पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडतील. हेही वाचा :  सचिनच्या विक्रमावर जडेजाची नजर, अश्विन-कोहलीला टाकलंय मागे आयर्लंड भारताला पराभूत करू शकला तर पाकिस्तानला याचा फायदा होईल. भारतीय संघाचे सध्या चार गुण असून आयर्लंडविरुद्ध पराभूत झाल्यास पॉइंट टेबलमध्ये भारत दुसऱ्या स्थानावरच राहिल. तर पाकिस्तानला अखेरचा सामना जिंकून ४ गुण मिळवण्याची संधी असेल. पाकिस्तान अखेरचा सामना जिंकल्यास भारताला मागे टाकून सेमीफायनलमध्ये पोहचू शकेल. कारण त्यांची धावगती भारतापेक्षा सरस आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket , india
  • First Published :
जाहिरात
जाहिरात