मुंबई, 21 फेब्रुवारी : भारताची महिला क्रिकेटर स्मृती मानधना सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आयसीसी महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये तिने आणखी एक अर्धशतक झळकावलं आहे. मानधनाने सोमवारी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात 56 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 87 धावा केल्या. स्मृती मानधनाने या खेळीसह अनेक विक्रमही केले. सलामीला खेळताना आंतरराष्ट्रीय महिला टी20 सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा एका डावात करण्याची कामगिरी स्मृती मानधनाच्या नावावर नोंद झाली. याआधी तिच्याच नावावर हा विक्रम होता. 2019 मध्ये तिने न्यूझीलंडविरुद्ध 86 आणि 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 83 धावांची खेळी केली होती. हेही वाचा : हरमनप्रीतने केला विश्वविक्रम, पुरूष आणि महिला क्रिकेटर्समध्ये अशी पहिलीच खेळाडू भारताने महिला टी20 वर्ल्ड कपच्या एका सामन्यात पहिल्यांदा 50 पेक्षा जास्त दोन भागिदारी केल्या. मानधनाने शफाली वर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 62 धावांची तर हरमनप्रीतसोबत दुसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागिदारी केली. महिला टी20 वर्ल्ड कपमध्या एका सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी करणारा भारत दुसरा संघ आहे. भारताच्या आधी ऑस्ट्रेलियाने 2014 मध्ये पाकिस्तानविरुद्ध अशी कामगिरी केली होती. स्मृती मानधना महिला टी20 आंतरराष्ट्रीय मध्ये डेविल्स नंबर (87) वर बाद होणारी पहिली क्रिकेटर आहे. 87 नंबर अनलकी मानला जातो, शतक करण्यासाठी 13 धावा कमी असल्यानं असं म्हटलं जातं. स्मृती मानधनाने याआधीही आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये दोनवेळा 80 पेक्षा जास्त धावा केल्या. पण पहिल्यांदाच ती बाद झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.