पार्ल, 12 फेब्रुवारी : महिला टी20 वर्ल्ड कपची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत झाली आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने 97 धावांनी विजय मिळवत टी20 मध्ये न्यूझीलंडवर सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. एलिसा हिलीने केलेल्या 55 धावा या तिच्या 2022 च्या टी20 वर्ल्ड कप फायनलनंतर केलेल्या सर्वाधिक धावा ठरल्या. तर कर्णधार मेन लेनिंगने 41 आणि एलिस पेरीने 40 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 173 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. सूझी बेट्स बाद झाल्यानंतर सुरु झालेली पडझड संघाचा डाव 76 धावांवर संपुष्टात आल्यावरच थांबली. ऑस्ट्रेलियाच्या एश्ले गार्डनर हिने सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 12 धावात 5 विकेट घेतल्या. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने टी20 वर्ल्ड कप पाच वेळा जिंकला आहे. हेही वाचा : Women T20 WC : स्मृती मानधना, हरमनप्रीत दुखापतग्रस्त! भारत-पाक सामन्यासाठी अशी असेल भारताची प्लेयिंग 11
दुसऱ्या बाजूला इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. वेस्ट इंडिजला 33 चेंडू आणि 7 गडी राखून पराभूत केलं. इंग्लंडसमोर वेस्ट इंडिजने 136 धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडने हे आव्हान 14.3 षटकात नॅट साइवर ब्रंट आणि हीथर नाइट यांच्या खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 135 धावा केल्या होत्या. कर्णधार हेली मॅथ्यूजने 42 तर शेमाइन कॅपबेलने 34 धावा केल्या. तर इंग्लंडची गोलंदाज सोफी एक्लेस्टोनने 23 धावात 4 विकेट घेतल्या.

)







