जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women Maharashtra Kesari : ऐसी धाकड है! प्रतीक्षा बागडी महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी

Women Maharashtra Kesari : ऐसी धाकड है! प्रतीक्षा बागडी महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी

ऐसी धाकड है! प्रतीक्षा बागडी महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी

ऐसी धाकड है! प्रतीक्षा बागडी महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी

पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे तर्फे यंदा प्रथमच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रतीक्षा बागडी हिने अंतिम लढत जिंकून पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 मार्च : महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात यंदा प्रथमच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  सांगली येथे ही स्पर्धा पारपडली असून या स्पर्धेत प्रतीक्षा बागडी  हिने  अंतिम लढत जिंकून पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रतीक्षा बागडी  हिने वैष्णवी पाटील  हिला चितपट केले. पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे तर्फे यंदा प्रथमच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 23 आणि 24 मार्च दरम्यान यास्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची अंतिम लढत सांगलीची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील यांच्यात पारपडली. कधीकाळी दोघी एकाच रूममध्ये राहत होत्या. तेव्हा मैत्रिणींमधील या लढतीची उत्सुकता सर्वांमध्ये होती अखेर प्रतीक्षा बागडी  वैष्णवी पाटीलला चितपट करून ही स्पर्धा जिंकली. स्पर्धेच्या उपांत्य लढतीत प्रतीक्षा बागडी हिने कोल्हापूरच्या अमृता पुजारीवर मात केली होती. प्रतीक्षाने 9-2 अशा गुण फरकाने अमृताचा पराभव करून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. कोण आहे प्रतीक्षा बागडी? सांगलीच्या तुंग गावची असलेली प्रतीक्षा बागडी ही 21 वर्षांची असून ती वसंत कुस्ती केंद्र सांगली इथं सराव करते. राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने पदके पटकावली आहेत. खेलो इंडियामध्ये तिने रौप्य पदक जिंकलं होतं. तर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ गटात रौप्य पदकावर नाव कोरलं होतं. तर आता तिने महिला महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्याने तिचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात