मुंबई, 18 फेब्रुवारी : पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही क्रिकेटमध्ये संधी आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगची घोषणा केली आहे. 4 मार्च पासून महिला प्रीमियर लीगच्या सामन्यांना सुरुवात होणार असून यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघाने मोठी घोषणा केली आहे. या महिला आयपीएलमध्ये आरसीबी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मानधनकडे सोपवण्यात आली आहे.
13 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे पारपडलेल्या महिला आयपीएलच्या लिलावात स्मृती मानधना हिला आपल्या संघांत घेण्यासाठी महिला आयपीएलचे पाचही संघ उत्सुक असताना आरसीबी संघाने तिला सर्वाधिक बोली लावून विकत घेतले. आरसीबीने स्मृतीवर 3.40 कोटी इतकी बोली लावली. या बोलीसह स्मृती मानधना आयपीएलमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली. आता महिला आयपीएल 2023 साठी आरसीबी संघाने स्मृतीवर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली आहे.
From one No. 18 to another, from one skipper to another, Virat Kohli and Faf du Plessis announce RCB’s captain for the Women’s Premier League - Smriti Mandhana. #PlayBold #WPL2023 #CaptainSmriti @mandhana_smriti pic.twitter.com/sqmKnJePPu
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) February 18, 2023
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आरसीबी संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. विराटचा एक व्हिडीओ आरसीबी संघाने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला असून यात विराटने याबाबत घोषणा केली आहे. तसेच मागील वर्षी आरसीबी संघाचा कर्णधार असलेल्या फाफ डु प्लेसिसने देखील स्मृती मानधनाला महिला प्रीमियरच्या कर्णधार पदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
स्मृती मानधनाने देखील या व्हिडीओच्या माध्यमातून आरसीबी फ्रेंचायजीचे आभार मानले असून ती आपण महिला आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे तिने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, IPL 2023, RCB, Smriti Mandhana, Women premier league 2023