मुंबई, 10 ऑक्टोबर : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 आशिया कप स्पर्धेत भारतीय टीमने थायलंडचा दारूण पराभव केला आहे. भारताची कॅप्टन स्मृती मानधनाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग घेतली होती. भारतीय बॉलर्सनी दिमाखदार कामगिरी करत थायलंड टीमला 15.1 ओव्हर्समध्ये अवघ्या 37 रन्समध्येच गुंडाळलं. भारताच्या पहिल्या डावातल्या कामगिरीमुळे ट्वीटरवर मीम्सचा महापूर आला. सोशल मीडियावर युझर्सनी भारतीय बॉलर्सच्या उत्कृष्ट खेळाबद्दल अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
महिलाच्या टी-20 आशिया कप स्पर्धेत भारतीय टीमचं उपांत्य फेरीतलं स्थान आधीच निश्चित झालं आहे. आज भारताची मॅच थायलंडविरुद्ध होती. त्यात टॉस जिंकून भारताने बॉलिंग स्वीकारली. भारतीय टीममधल्या बॉलर्सनी जबरदस्त खेळाचं प्रदर्शन या मॅचमध्ये केलं आहे. त्यामुळे थायलंडच्या टीमला 15.1 ओव्हर्समध्ये केवळ 37 रन्स काढता आल्या. भारतीय बॉलर स्नेह राणाने 3 विकेट्स घेतल्या, तर राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्माने पहिली विकेट घेऊन 4 ओव्हर्समध्ये केवळ 10 रन्स दिल्या. मेघना सिंह हिनेही एक विकेट घेतली.
Pakistan Women's team looking at Thailand crumbling against India women..#WomensAsiaCup2022 #Indiawomen pic.twitter.com/fhPaF4Q1r5
— Jatin Sharma (@jatincricket) October 10, 2022
#INDW all outed #THAIW for 37 runs#WomensAsiaCup #CricketTwitter pic.twitter.com/8MLZUpKDUt
— India Women's Team (@women_cric_ind) October 10, 2022
जिंकण्यासाठी भारतीय टीमसमोर केवळ 38 रन्सचं लक्ष्य होतं. भारतानं 6 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स राखून हे लक्ष्य पूर्ण केलं. सब्बीनेनी मेघना आणि शेफाली वर्मा यांनी ओपनिंग केलं. सुरुवातीला आलेल्या शेफाली वर्माच्या गेलेल्या फॉर्ममुळे आजच्या मॅचमध्येही तिला टिकून राहता आलं नाही. तिनं 6 बॉल्समध्ये 8 रन्स केल्या. त्यानंतर आलेल्या पूजा वस्त्रकार हिनं 12 बॉल्समध्ये 12 रन्स केल्या, तर सब्बीनेनी मेघना हिनं 18 बॉल्समध्ये 20 रन्स केल्या.
भारतीय महिलांच्या या खेळीमुळे ट्विटरवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. पहिल्या डावातील सुपर्ब गोलंदाजीमुळे ट्विटरवर मीम्सचा पूर आला होता. 'भारतीय बॉलिंगमुळे थायलंडचा डाव 37 धावांवर आटोपला. भारतीय बॉलर्सकडून उत्कृष्ट खेळीचं प्रदर्शन,' अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. थायलंडची टीम भारतीय टीमपुढे उद्ध्वस्त झालेली पाहून पाकिस्तानी महिला टीमला कसं वाटेल, हे दाखवणारी मीम्सही ट्विटरवर शेअर झाली आहेत.आता 13 ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, बांग्लादेश, यूएई आणि मलेशिया अशा 7 टीम्स खेळत आहेत. उपांत्य फेरीतल्या विजयी टीम्सचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होईल.
Keywords :
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Asia cup, Team india