दिल्ली, 13 जुलै : प्रतिष्ठेच्या ग्रँड स्लॅमपैकी एक असणारी विम्बल्डन टेनिस स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. महिला, पुरुष एकेरी आणि दुहेरीचे सेमिफायनलिस्ट ठरले आहेत. यंदाचे विम्बल्डन भारतासाठी खास ठरण्याची शक्यता आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना याने ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेनसोबत सेमीफायनल गाठली आहे. त्याने तिसऱ्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. वयाच्या 43 व्या वर्षी रोहन बोपन्नाने ऑस्ट्रेलियन जोडीदारासोबत टालोन ग्रिक्सपूर आणि बार्ट स्टिव्हन्स यांच्या जोडीला हरवलं. यासह तिसऱ्यांदा त्याने सेमीफायनल गाठली. याआधी रोहन बोपन्ना 2015 मध्ये सेमीफायनलमध्ये स्थान पटकावलं होतं. 2010 मध्ये रोहन बोपन्नाला अमेरिकन ओपनच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. ठरलं! मुंबईचा यशस्वी जैसवाल करणार कॅरेबियन बेटांवर कसोटी पदार्पण एरिना सबालेंका सेमीफायनलमध्ये एरिना सबालेंकाने बुधवारी मेडिसन कीजला सरळ सेटमध्ये हरवलं. या विजयासह तिने सलग दुसऱ्यांचा महिला एकेरीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. बेलारूसची असलेली सबालेंका २०२१ मध्येही सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. तर २०२२ मध्ये तिच्यावर बंदी घातली होती. सबालेंकाचा सामना सेमीफायनलमध्ये ओन्स जेब्युएरविरुद्ध होणार आहे. याशिवाय स्वितोलिना विरुद्ध वोड्रुसोवा यांच्यात दुसरी सेमीफायनल होणार आहे. विम्बल्डन सेमीफायनलमध्ये अल्कारेज सर्वात तरुण कार्लोस अल्कारेजने पहिल्यांदाच विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. २० वर्षाच्या कार्लोसने डेन्मार्कच्या होलगलरा सरळ सेटमध्ये हरवलं. विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. सेमीफायनलला दानिल मेदवेदेवशी सामना करावा लागणार आहे. याशिवाय दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि सिनर हेसुद्धा सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. हे दोघे सेमीफायनलमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.