मिनी लिलावात मेगा खरेदी! फ्रँचाइजींनी 5 खेळाडुंवर खर्च केले 82 कोटी
आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव कोचीमध्ये आज झाला. या मिनी लिलावात काही खेळाडूंवर मोठी बाली लागली. यातील पाच खेळाडूंवरच फ्रँचाइजींनी 82 कोटी रुपये खर्च केले.
सॅम करनवर आयपीएलच्या इतिहासात सर्वात मोठी बोली लागली. याशिवाय बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, निकोलस पूरन यांच्यावरही पैशांची उधळण झाली.
2/ 6
सॅम करनला पंजाब किंग्जने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लावत संघात घेतलं. प्रिती झिंटा मालकीण असलेल्या पंजाब किंग्जने त्याला १८.५० कोटी रुपयात खरेदी केलं.
3/ 6
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटर कॅमरून ग्रीनला मिंबई इंडियन्सने १७.५ कोटी रुपये बोली लावली. तो आयपीएलच्या इतिहासातील दुसरा महागडा खेळाडू ठरला.
4/ 6
बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्जने मोठी बोली लावत संघात घेतलं. बेन स्टोक्ससाठी चेन्नईने १६.५ कोटी रुपये मोजले. बेन स्टोक्सला आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत तिसऱ्यांदा १० कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लागली आहे.
5/ 6
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनला लखनऊ सुपर जायंट्सने संघात घेतलं. त्याच्यासाठी लखनऊने १६ कोटी रुपये मोजले.
6/ 6
इंग्लंडचा क्रिकेटपटू हॅरी ब्रूकला सुरुवातीलाच सनरायजर्स हैदराबादने १३ कोटी रुपयांमध्ये संघात घेतलं. राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी पहिल्यांदा बोली लावली होती.